युटोपियन शुगर्स चे बॉयलर अग्निप्रदीपन संपन्न- चालू गळीत हंगामा मध्येही युटोपियन अपेक्षित ऊस गाळपाचे उद्दीष्ट पूर्ण करेल –उमेश परिचारक

युटोपियन शुगर्स चे बॉयलर अग्निप्रदीपन संपन्न-
चालू गळीत हंगामा मध्येही युटोपियन अपेक्षित ऊस गाळपाचे उद्दीष्ट पूर्ण करेल –उमेश परिचारक

मंगळवेढा प्रतिनिधी:- कचरेवाडी ता.मंगळवेढा येथील युटोपियन शुगर्स लि.या कारखान्याच्या २०२३-२०२४ या दहाव्या गळीत हंगामाचे बॉयलर पूजन व अग्निप्रदीपन समारंभ मंगळवार दि.१७ /१०/२०२३ रोजी आयोजित करण्यात आले होते. कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक यांच्या शुभहस्ते बॉयलरपूजन व अग्निप्रदीपन करण्यात आले. अत्यंत साधेपणाने व संपूर्णत: कौटुंबीक व उत्साही वातावरणात हा संपूर्ण कार्यक्रम पार पडला.

प्रारंभी कारखान्याचे संगणक विभाग प्रमुख अभिजीत यादव व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.जयश्री यांच्या शुभहस्ते सपत्नीक सत्यनारायण महापूजा करण्यात आली.

यावेळी बोलताना चेअरमन श्री उमेश परिचारक म्हणाले की, गळीत हंगाम २०२३-२०२४ हा आपल्या कारखान्याचा दशकपूर्ती गळीत हंगाम आहे. मागील ९ वर्षात केवळ ऊस उत्पादक व कर्मचारी बांधव यांच्या विश्वासावर आपल्या कारखान्याने नावलौकिक मिळवलेला आहे. ही विश्वासाहर्ता कायम ठेवण्यासाठी युटोपियन हा कायम बांधील राहील असा विश्वास ही परिचारक यांनी व्यक्त केला.

सध्या दुष्काळ सदृश्य स्थिती असतानाही कारखाना चालू गळीग हंगाम २०२३-२०२४ व पुढील ही गळीत हंगाम२०२४-२०२५ हा सुद्धा केवळ ऊस उत्पादक यांच्या विश्वासावर, व ऊस उत्पादक यांना वेळेत व चांगला दर देत असल्यामुळे यशस्वी पार पडेल असा आशावाद व्यक्त करीत पुढील काळात ही खाजगी कारखान्याच्या तुलनेत ऊस दराबाबतीत युटोपियन कदापी मागे राहणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

 

मागील गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये कारखान्याने १ कोटी ४४ लाख लिटर चे इथेनोल उत्पादन केले आहे साधारण पणे तितकेच उत्पादन याही वर्षी अपेक्षित आहे गळीत हंगाम २०२३-२०२४ करीता आपली सर्व यंत्रणा सज्ज आहे. सर्व कामगार वर्गांनी आपले कौशल्य पणाला लावून कार्यरत राहावे व गळीत हंगाम यशस्वी करावा व शक्य तितके काटकसरीचे धोरण अवलंबावे त्यातच आपणा सर्वांचे हित असल्याचे ही त्यांनी सांगितले
सदर प्रसंगी प्रगतशील बागायतदार नागनाथ मोहिते यांचे सह कारखान्याचे सर्व खातेप्रमुख , अधिकारी, व कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.

यावेळी स्वागत , प्रास्ताविक व आभार लक्ष्मण पांढरे यांनी केले

युटोपियन शुगर्स लि.या कारखान्याच्या गळीत हंगाम २०२३-२४ करीता आयोजित बॉयलर अग्निप्रदीपन कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक,व रोहन परिचारक यांच्या समवेत विभाग प्रमुख अभिजीत यादव यांच्या सुविद्य पत्नी सौ.जयश्री यांच्या शुभहस्ते करण्यात आले.सदर प्रसंगी प्रगतशील बागायतदार नागनाथ मोहिते यांचे समवेत कारखान्याचे सर्व खाते-प्रमुख,अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात दिसत आहे.

 

Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या