इंदापूर तालुक्यातील भिगवण पुन्हा कोरोनाचे हॉटस्पॉट; डॉक्टरचे रिपोर्ट पॉझिटिव्ह!

भिगवण | इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील महिला डॉक्टर व त्यांचा मुलगा कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर मदनवाडी (ता. इंदापूर) येथील आणखी एका बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे भिगवण व परिसर पुन्हा कोरोनाचे हॉटस्पॉट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.त्यामुळे भिगवणकरांना काळजी घेण्याची आणि सतर्क राहण्याचे आव्हान प्रशासनाच्या वतीने करण्यात आहे आले.

अद्याप कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील एकूण ३० व्यक्तींचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. त्याकडे भिगवणकरांचे लक्ष लागले आहे.
भिगवण येथील स्त्रीरोग तज्ज्ञ महिला डॉक्टर व त्यांच्या मुलाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे येथील वैद्यकीय क्षेत्राला मोठा धक्का बसला होता. त्यातून सावरत असतानाच सोमवारी मदनवाडी येथील बालरोग तज्ज्ञांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे मोठी खळबळ उडाली. या बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांनी कोरोना पॉझिटिव्ह महिला डॉक्टरांच्या हॉस्पिटलला शस्त्रक्रियेनिमित्त भेट दिली होती. महिला डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी बारामती येथील रुई ग्रामीण रुग्णालयामध्ये कोरोना चाचणी केली होती. त्याचा अहवाल सोमवारी सकाळी प्राप्त झाला. त्यामध्ये त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या