लाला पानकर भाजपच्या शहराध्यक्षांनी फुंकले पालकमंत्र्यांचे कान ! रस्त्यावर उतरले प्रशासन राज …

शहराध्यक्षांनी फुंकले पालकमंत्र्यांचे कान !
रस्त्यावर उतरले प्रशासन राज …
पंढरपूर (प्रतिनिधी)
केंद्रात आणि राज्यात शतप्रतिशत भाजपाची सत्ता स्थापन झाली. यामुळे राज्यातील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना मोठे स्थान प्राप्त झाले. पंढरपूरचे शहराध्यक्ष लाला पानकर हे
पंढरपूर शहरातील एका कामाबाबत पालकमंत्र्यांना भेटले आणि यानंतर दोनच दिवसांनी मुख्याधिकारी येऊन या कामाची पाहणी करू लागले. होय काही दिवसातच या रस्त्याचे कामही सुरूही होईल . यालाच म्हणतात भाजप पदाधिकाऱ्यांचा इफेक्ट.
राज्यात एक हाती वर्चस्व मिळवलेल्या भाजपातील पदाधिकाऱ्यांना मोठी संधी प्राप्त झाली आहे. कायमच विरोधी पक्षात काम करणाऱ्या या पदाधिकाऱ्यांना , आता सुगीचे दिवस आले आहेत. याचा प्रत्यय मागील दोन दिवसात आला.
पंढरपूर शहरातील भुयाचा मारुती ते मांडव खडकी येथील ड्रेनेज पाईपलाईनचे काम पूर्ण करण्यात आले आहे. ड्रेनेजसाठी खोदकाम करण्यात आल्याने रस्त्याची दुरावस्था झाली आहे.
शुक्रवारी पालकमंत्री जयकुमार गोरे हे पंढरी नगरीत आषाढी यात्रेच्या पूर्वतयारीच्या पाहणीसाठी आले होते. यावेळी भाजपा शहराध्यक्ष व रोहित उर्फ लाला पानकर आणि भाऊ टमटम यांनी पालकमंत्र्यांची भेट घेतली होती. या रस्त्याच्या दुरुस्तीची चर्चा करून , रस्ता तात्काळ बनवून देण्यात यावा, याबाबत मागणी केली होती.
यानंतर दोनच दिवसांनी म्हणजे रविवारी मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी या रस्त्याची पाहणी केली. त्यावेळी युवा नेते प्रणव परिचारक हेही त्यांच्या सोबत होते. या रस्त्याबाबत भाजपा शहराध्यक्ष रोहित पानकर आणि भाऊ टमटम यांच्याशी मुख्याधिकाऱ्यांनी चर्चा केली.
हा रस्ता लवकरात लवकर म्हणजे आषाढी यात्रेपूर्वी
बनविण्यात यावा अशी मागणी यावेळी पानकर यांनी केली.
भुयाचा मारुती ते खडकी मांडव हा रस्ता ड्रेनेज दुरुस्तीच्या कामामुळे उघडण्यात आला आहे. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे हा रस्ता नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. पुढे काही दिवसांनीच आषाढी यात्रा भरणार आहे. आषाढी यात्रेत या परिसरात अनेक भाविक मुक्कामासाठी असतात. येथील नागरिकांची आणि आषाढी यात्रेतील भाविकांची यामुळे गैरसोय होणार आहे. यासाठी प्रशासनाने आषाढी यात्रेपूर्वीच या रस्त्याचे काम पूर्ण करावे , अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष रोहित उर्फ लाला पानकर यांनी पंढरपूर नगरपरिषद प्रशासनाकडे केली आहे.