पंढरपूर शहर व तालुक्यातील अवैध दुध विक्री केंद्रांचा सुळसुळाट, अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष, सर्वसामान्यांचे आरोग्य रामभरोसे!

पंढरपूर शहर व तालुक्यातील अवैध दुध विक्री केंद्रांचा सुळसुळाट, अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष, सर्वसामान्यांचे आरोग्य रामभरोसे!

पंंढरपूर (प्रतिनिधी) : पंंढरपूर शहर व तालुक्यात अनेक अवैध दुध विक्री केंद्र असुन याठिकाणी होते भेसळयुक्त दुध व दुग्धजन्य पदार्थ विक्री होत असून अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे आरोग्य रामभरोसे बनले आहे. असा खळबळजनक गौप्यस्फोट पंंढरपूर येथील समाजसेवक महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी केला आहे.

एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे त्यांनी माहिती दिली आहे की, काही दिवसांपूर्वी च पंंढरपूर तालुक्यातील भोसे गावच्या परिसरात एका दुध डेअरी मध्ये भेसळयुक्त दुध निर्मिती होत असल्याचा गुन्हा उघडकीस आला असुन यामुळे पंढरपुर शहर व तालुक्यात अनेक ठिकाणी दुधात भेसळ करून त्याची विक्री केली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पंंढरपूर शहरात जर नजर टाकली तर वेगवेगळ्या भागात अनेक दुध डेअरी आहेत ज्यांची तपासणी अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाचे अधिकारी करत नाहीत, त्यामुळे भेसळयुक्त दुध आणि दुग्धजन्य पदार्थ सर्रासपणे विक्री केले जाते, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला आहे.

तातडीने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंढरपूर शहर परिसरातील विविध भागात असलेल्या दुध डेअ-यांची तपासणी करावी व जर यामध्ये कोण दोषी आढळले तर त्यावर कडक कारवाई करावी. अशी मागणी गणेश अंकुशराव यांनी केली आहे. जर यावर कारवाई झाली नाही तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करू. असा इशाराही गणेश अंकुशराव यांनी दिला आहे.

ताज्या बातम्या