पंढरपूर उपविभागीय अधिकारी सोमवार अन् शुक्रवार नागरिकांना भेटणार

पंढरपूर उपविभागीय अधिकारी सोमवार अन् शुक्रवार नागरिकांना भेटणार
पंढरपूर (दि १६):-जिल्हयात 100 दिवसीय कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पंढरपूर उपविभागातील नागरिकांचे प्रश्न तत्काळ मार्गी लावण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांना दर सोमवारी व शुक्रवारी सकाळी ११.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत नागरिकांना आपल्या कामानिमित्त भेटता येईल, अशी माहिती उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी दिली.
पंढरपूर उपविभागातील पंढरपूर व मोहोळ तालुक्यातील नागरिक ग्रामीण भागातुन आल्यावर उपविभागीय अधिकारी बैठकीस किंवा गावभेटीच्या निमित्ताने बाहेरगावी असल्यास त्यांची भेट होत नाही. त्यासाठी ही आठवड्यातून दोन वेळेस लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी उपविभागीय अधिकारी उपस्थित असणार आहेत.
संबंधित वेळेत तक्रारदार नागरिक, अभ्यागत आणि शेतकऱ्यांनी त्यांच्यासाठी निश्चित केलेल्या वेळेत उपविभागीय कार्यालय पंढरपूर येथे भेट द्यावी असे आवाहन उपविभागीय अधिकारी श्री इथापे यांनी केले आहे.
My partner and I absolutely love your blog and find many of your post’s to be exactly what I’m looking for. Would you offer guest writers to write content for you? I wouldn’t mind publishing a post or elaborating on a lot of the subjects you write with regards to here. Again, awesome blog!