पंढरीतील धूळ समस्ये प्रकरणी जिल्हा काँग्रेस ओबीसी आक्रमक …

पंढरीतील धूळ समस्ये प्रकरणी जिल्हा काँग्रेस ओबीसी आक्रमक …
सध्या पंढरपूर शहरात सगळीकडे धुळीचे साम्राज्य पसरलेले आहे व यामुळे सर्व पंढरपूरकरांना श्वसनाच्या त्रासाल व विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे असा आरोप काँग्रेस ओबीसी चे मा. जिल्हाध्यक्ष समीर कोळी व जिल्हा काँग्रेस कमिटी यांनी करत नगरपालिका प्रशासनास निवेदन देऊन 25 जानेवारी पर्यंत जर पंढरीतील धुळीवर योग्य उपाय योजना न केल्यास प्रजासत्ताक दिनी उपोषणाचा इशारा देत धारेवर धरले आहे.
पंढरपूर ही महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून ओळखली जाते येथे चार वाऱ्यांकरता कोट्यावधींचा निधी दिला जातो व नगरपालिका प्रशासन सुद्धा विविध करांच्या माध्यमातून कर आकारणी अगदी सक्तीने करत असते मात्र या करांच्या बदल्यात दररोज अर्धा किलोच्या वर धुळच खावी लागत आहे या धुळीमुळे त्यांच्या छातीत चिकुल झाला आहे.
नगरपालिकेकडे खूप वर्षांपूर्वी रोड स्वीपर्स दाखल झालेले आहेत तरीपण रोड स्लीपर्स गेल्या अनेक वर्षापासून वापरा वापरा अभावी स्वतःच धुळखात पडलेले आहेत तर माणसांचे काय?
यावेळी सोलापूर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष नागेशजी गंगेकर जिल्हा उपाध्यक्ष सुहास भाळवणकर जिल्हा सरचिटणीस राजाभाऊ ऊराडे तालुका
आध्यक्ष हनुमंत मोरे, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा युवक अध्यक्ष बलदेव शिकलकर काँग्रेस वाहतूक संघटना जिल्हाध्यक्ष दिलीप तात्या फडतरे समाजसेवक शिवाजी राजे धोत्रे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मामा फलटणकर व ज्येष्ठ नेते प्राध्यापक अशोक डोळ नागनाथ आधटराव धनंजय काकडे आनंद सोमासे देवानंद इरकल पंढरपूर मंगळवेढा सोशल मीडिया अध्यक्ष बाळासाहेब आसबे, बाळासाहेब अंकुशराव ,युवराज जाधव ,सचिन मगर ,भास्कर जगताप व सर्व आजी-माजी पदाधिकारी व काँग्रेस प्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या