रड्डे येथील माजी सरपंचासह चार विद्यमान ग्रा.पं. सदस्यांचा अनिल सावंत यांना पाठिंबा

रड्डे येथील माजी सरपंचासह चार विद्यमान ग्रा.पं. सदस्यांचा अनिल सावंत यांना पाठिंबा
नंदेश्वर/ प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील रड्डे गावचे माजी सरपंच सुरेश कांबळे, तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रोहिदास कांबळे, अनिल माने, लक्ष्मी दत्ता बनसोडे, लक्ष्मी विकास क्षिरसागर, रुपाली काकासो थोरबोले यांचेसह, माजी ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल सावंत यांना पाठिंबा दिला असून या भागामधून माजी सरपंच सुरेश कांबळे यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी सावंत यांना सहकार्य करण्याचा एक मुखाने निर्णय घेतल्याने या भागामध्ये अनिल सावंत यांची ताकद वाढली आहे. अनिल सावंत यांचे बंधू विजय सावंत यांचे हस्ते व शेती अधिकारी लोंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
सुरेश कांबळे यांचे भोसे जिल्हा परिषद गट तसेच रड्डे पंचायत समिती गणात चांगले वजन असून त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी अनिल सावंत यांना पाठिंबा दिल्यामुळे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार अनिल सावंत यांचे या मतदारसंघात तसेच भोसे गटात चांगले वजन वाढले असून त्यांचे सर्व कार्यकर्ते अनिल सावंत यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत.
यावेळी कांबळे यांनी बोलताना सांगितले की, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्यावर निष्ठा राखणारे दक्षिण भागातील सर्व कार्यकर्ते अनिल सावंत यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असून आतापर्यंतच्या लोकप्रतिनिधींनी दक्षिण भागातील रस्ते व पाणी प्रश्नावर निवडणुका लढवल्या आहेत.परंतु अनिल सावंत यांनी तरुणाच्या हाताला काम मिळावे यासाठी उद्योगधंदे उभे करणे व शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून उच्च दर्जाचे शिक्षण देण्याचे काम केले आहे.त्यामुळे प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण अनिल सावंत यांना एक मुखाने मदत करणार असल्याचे माजी सरपंच सुरेश कांबळे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

4 thoughts on “रड्डे येथील माजी सरपंचासह चार विद्यमान ग्रा.पं. सदस्यांचा अनिल सावंत यांना पाठिंबा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या