माढा मतदारसंघातील परंतू पुणे आणि पिंपरी चिंचवड भागात स्थायिक झालेल्या मतदारांशी अभिजीत पाटीलांनी साधला संवाद

माढा मतदारसंघातील परंतू पुणे आणि पिंपरी चिंचवड भागात स्थायिक झालेल्या मतदारांशी अभिजीत पाटीलांनी साधला संवाद

*विकासाचे व्हिजन असल्याने मतदारांकडूनही मिळाला आहे भक्कम शब्द*

*अभिजीत पाटील लवकरच सादर करणार जनतेच्या मनातील विकासाची ब्ल्यू प्रिंट*

(चेअरमन अभिजीत पाटील यांचा जनसंपर्क वाढीवर मोठा भर)


पंढरपूर प्रतिनिधी /-

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे कर्तव्यतत्पर आणि गतिमान चेअरमन अभिजित पाटील यांनी माढा विधानसभा लढविण्याच्या दृष्टीने जोरदार तयारी सुरू केली आहे. माढा विधानसभा मतदारसंघातून आमदार होण्यासाठी या भागातील मतदारांची जनसंपर्क वाढवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

माढा तालुक्यातील मतदार असलेल्या पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरात स्थायिक झालेल्या नागरिकांशीही गुरुवारी संवाद साधला असून,विकासाचे व्हिजन असलेल्या चेअरमन अभिजीत पाटील यांना या मतदानातून उत्स्फूर्त प्रतिसाद देण्यात आला आहे. पिपंरी चिंचवड भागातील मतदारांना कलासागर हाॅल येथे सकाळी तर पुणे येथील मतदाराशी हडपसर येथील राजयोग लॉन्स याठिकाणी जनसंवाद साधला आहे.

या संवाद कार्यक्रम प्रसंगी माढा मतदारसंघात मूलभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, रोजगार निर्मिती, महिला सक्षमीकरण, तसेच उद्योग निर्मिती अशा विविध विषयावर प्रत्येकाने आपली भूमिका मांडली. पुणे-मुंबई सारखं आपलं गाव, आपल्या तालुक्यात सुधारणा व्हावी यासाठी प्रत्येकाची तळमळ दिसत होती. त्याच मताचा मी जाहीरनामा (विकासाची ब्लू प्रिंट) तयार करणार असून लवकरच तो आपल्या समोर सादर केला जाईल. असे अभिजित पाटील यांनी विश्वास देऊन सांगितले.

 

आपल्या घरचा माणूस भेटल्यानंतर बोलल्यानंतर नवीनच एक ऊर्जा आणि बळ मिळतं, त्याची प्रचिती आली. नक्कीच दरवर्षी या स्नेहमेळाचा आयोजन आणि एकत्र येण्याचा संकल्प करून प्रत्येकाच्या सुख, दुःखामध्ये उभे राहण्याचं आश्वसनही यावेळी उपस्थित मतदारांना देण्यात आले. यावेळी या बांधवांचं प्रेम आणि भरभरून प्रतिसाद पाहता नक्कीच येत्या काळात यश मिळेल अशी आशाही अभिजित पाटील यांनी व्यक्त केली आहे .यावेळी हजारोच्या संख्येने मतदार, युवक तरूण मंडळीसह, महिला भगिंनी देखील उपस्थित होत्या..

माढा मतदारसंघातील पुणे, पिंपरी चिंचवड शहरामध्ये स्थायिक झालेल्या नागरिकांशी संवाद साधला असून मूलभूत सोयीसुविधा, शिक्षण, आरोग्य, रोजगार निर्मिती, महिला सक्षमीकरण तसेच उद्योग निर्मिती अशा विविध विषयांवर काम करून पुणे-मुंबई सारखी आपले गाव आपल्या तालुक्यात सुधारणा व्हावी. यासाठी काम करणार असून नागरिकांचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवूनच आपला विधानसभेचा विकास कामाचा अजिंठा असणार असा विश्वास उपस्थित नागरिकांना अभिजीत पाटील यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या