लायन्स क्लब पंढरपूरचा वर्धपान दिन साजरा :- लायन्स क्लब ऑफ पंढरपूरची स्थापना 10 ऑक्टोबर 1986 रोजी झाली असून लायन्स क्लब पंढरपूरला 38 वर्ष पूर्ण झाले असून 39व्या वर्षी पदार्पण केले.

लायन्स क्लब पंढरपूरचा वर्धपान दिन साजरा :-
लायन्स क्लब ऑफ पंढरपूरची स्थापना 10 ऑक्टोबर 1986 रोजी झाली असून लायन्स क्लब पंढरपूरला 38 वर्ष पूर्ण झाले असून 39व्या वर्षी पदार्पण केले.

लायन्स क्लब ऑफ पंढरपूरचे प्रथम अध्यक्ष हे संजूभाई कोठाडीया होते.

लायन्स क्लब पंढरपूरचे पंढरपुरामध्ये विविध प्रकारे सेवा कार्य चालू असून राजीव कटेकर यांनी सांगितले की पंढरपुरामध्ये लायन्स क्लब पंढरपूर संचलित शहीद मेजर कुणाल गोसावी निवासी शाळा आहे
व लायन्स क्लब ऑफ पंढरपूरचे आय हॉस्पिटल आहे त्यामध्ये कमी पैशांमध्ये नागरिकांचे डोळ्याचे ऑपरेशन होतात
या नागरिकांना कोणीही पालक नाही अशा नागरिकांची मोफत ऑपरेशन केले जातात.
तसेच लायन्स क्लब ऑफ पंढरपूरने रघुकुल सोसायटी ठाकरे चौक पंढरपूर

लायन्स चिल्ड्रन हेल्थ पार्क तयार केले त्यामध्ये त्या भागातील व पंढरपुरातील बहुसंख्य मुले खेळण्यासाठी व्यायामासाठी येतात.
यावर्षीही परदेशी नगर व इसबावी येथे लायन्स चिल्ड्रन हेल्प पार्क व नाना नानी पार्क पुण्यात येणार असल्याचे अध्यक्ष आरती बसवंती यांनी सांगितले. लायन्स क्लब चे झोन चेअरमन विवेक परदेशी यांनी सांगितले की यावर्षी लायन्स क्लब पंढरपूरचे लायन्स हेल्थ क्लिनिक ला सुरुवात झाली असून दर शुक्रवारी सायंकाळी परदेशी फिजीओथेरपी क्लिनिक, परदेशी नगर, पंढरपूर येथे डॉक्टर मोफत तपासणी करत असून नागरिकांना मोफत औषध देण्यात येतात हा परमनंट प्रोजेक्ट चालू केले असल्याचे सांगितले. अशा प्रकारे लायन्स क्लब ऑफ पंढरपूरचे खूप उल्लेखनीय कार्य असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे माझी खजिनदार सुमित गडम व त्यांचे बंधू आदर्श व्यापारी अमित गडम यांचा वाढदिवस असल्याने लायन्स क्लब पंढरपूरच्या प्रति प्रमाणे त्यांचा वाढदिवस अंधशाळेमध्ये विद्यार्थ्यांबरोबर साजरा करण्यात आला व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक परदेशी यांनी केले असून आभार राजेंद्र शिंदे यांनी मानले.
सदर प्रसंगी राजीव कटेकर, अध्यक्ष आरती बसवंती, सेक्रेटरी ओंकार बसवंती खजिनदार शोभा गुप्ता,राजेंद्र शिंदे, कैलास करंडे , इम्रान मुल्ला, शिक्षिका रोहिणी घोडके व अश्विनी माने आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या