अनिल सावंत यांनी केले तरुणांचे स्वप्न साकार; शेकडो विद्यार्थ्यांना रोजगार मेळाव्यातच देण्यात आले नियुक्तीपत्र..

अनिल सावंत यांनी केले तरुणांचे स्वप्न साकार; शेकडो विद्यार्थ्यांना रोजगार मेळाव्यातच देण्यात आले नियुक्तीपत्र..
भैरवनाथ शुगर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत यांनी आज रविवार दिनांक 6 ऑक्टोबर 2024 ला रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. संत तनपुरे महाराज मठ पंढरपूर या ठिकाणी भव्य रोजगार मेळावा पार पडला.
रोजगार मेळावा कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि विठ्ठल मूर्तीची पूजा करून करण्यात आली. दीप प्रज्वलन आणि विठ्ठलाच्या मूर्तीची पूजा उपस्थित मान्यवर आणि रोजगार मेळाव्यासाठी आलेल्या दोन तरुणी आणि दोन तरुणांनी केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन एमआयटी कॅम्पुटरचे संचालक श्याम गोगाव यांनी केले. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष संदीप मांडवे, पंढरपूर शहर काँग्रेसचे युवक अध्यक्ष संदीप शिंदे, गणेश माने शहराध्यक्ष काँग्रेस सेवा दल, सुधीर अभंगराव जिल्हाप्रमुख शिवसेना ( उबाठा), महादेव पाटील जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी, किरण घाडगे संभाजी ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, भैरवनाथ उद्योग समूहाचे विविध पदाधिकारी आणि कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
अनिल सावंत भाषण-
रोजगार मेळाव्यामध्ये नोकरीच्या शोधात आलेल्या तरुण-तरुणीशी संवाद साधताना अनिल सावंत म्हणाले, पंढरपूर मंगळवेढ्यामध्ये सुशिक्षित आणि होतकरू तरुणांची मोठी संख्या आहे. या तरुणांकडे स्किल असून देखील रोजगार नाही. अनेकांना मुंबई, पुणे या ठिकाणी मुलाखती देण्यासाठी जाणं शक्य होत नाही. तिथे त्यांची राहायची, जेवणाची सोय होत नसल्याने अनेक विद्यार्थी जात नाहीत. अनेक तरुण बाहेरगावी मुलाखतीला गेल्यानंतर प्रेशर घेतात. यासाठी आपण पंढरपूरमध्येच हा भव्य रोजगार मेळावा आयोजित केला आहे. उपस्थित सर्व तरुण-तरुणींना मी आवाहन करतो अजिबात प्रेशर घेऊ नका. 50 कंपनीमध्ये 4 हजार 500 मुलांची रिक्वायरमेंट आहे. काहीही अडचण आली तर संपर्क करा.
अनिल सावंत यांनी आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यात एकूण 50 कंपन्या सहभागी झाल्या होत्या. रोजगार मेळाव्यासाठी एकूण 1,440 तरुणांनी मुलाखती दिल्या. यातून 439 उमेदवारांना नियुक्तीपत्र अनिल सावंत यांच्या हस्ते देण्यात आले.
नियुक्तीपत्र देण्यात आलेल्ल्या उमेदवारांशी संवाद साधला. प्लेसमेंट झालेल्या तरुणांच्या भावना..
अनिल दादा सावंत यांनी रोजगार मेळाव्याचे आयोजन केल्यामुळे, आम्ही या मेळाव्यात सहभागी झालो. मुलाखती देऊ शकलो. आणि नोकरी देखील मिळाली. आम्हाला मिळालेल्या नोकरीमध्ये दादांचा देखील वाटा आहे. त्यामुळे आमच्याकडून त्यांना बिग थँक्यू, आणि त्यांच्या इच्छा, अपेक्षा या विधानसभा निवडणुकीला पूर्ण होतील अशा शुभेच्छाही देतो.
मुलाखतीसाठी आलेल्या तरुणांना कोणतीही अडचण होऊ नये, यासाठी संयोजकांकडून सकाळी नाष्टा आणि दुपारी जेवणाची व्यवस्था केली होती.
रोजगार मेळाव्यामध्ये कंपनीकडून आलेल्या प्रत्येक प्रतिनिधींना भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत यांच्या हस्ते विठ्ठलाची मूर्ती देऊन सत्कार केला. आणि कार्यक्रमाची सांगता केली.