पंढरपूर – मंगळवेढा विधानसभेसाठी भाजपाने केली उमेदवारांची चाचपणी मंगळवेढ्यात भाजपाने घेतले गुप्त मतदान परिचारक समर्थकांनी उघडपणे केली उमेदवारीची मागणी

पंढरपूर – मंगळवेढा विधानसभेसाठी भाजपाने केली उमेदवारांची चाचपणी

मंगळवेढ्यात भाजपाने घेतले गुप्त मतदान

परिचारक समर्थकांनी उघडपणे केली उमेदवारीची मागणी

पंढरपूर, प्रतिनिधी-:

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीसाठी बुधवारी मंगळवेढा येथे भाजपाच्या वतीने अंतर्गत गुप्त मतदान घेण्यात आले. मतदारसंघातील ९७ प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या गुप्त मतदानाम ध्ये सहभाग घेतला. पक्षनिरीक्षक तथा आमदार महेश लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे गुप्त मतदान पार पडले. मात्र मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर परिचारक समर्थक भाजप पदाधिकाऱ्यांनी उघडपणे माजी आ. प्रशांत परिचारक यांनाच भाजपाची उमेदवारी देण्याची मागणी पक्षनिरीक्षक लांडगे यांच्याकडे केली.

लोकसभा निवडणुकीमध्ये स्थानिक पदाधिकाऱ्यांना विचारात न घेता पक्षाने उमेदवार जाहीर केले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपने सावध पवित्रा घेत पदाधिकाऱ्यांचे थेट गुप्त मतदान

घेतले आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून भाजपकडून विद्यमान आ. समाधान आवताडे आणि माजी आ. प्रशांत परिचारक हे दोघेही इच्छुक आहेत. त्यामुळे पदाधिकाऱ्यांचा कौल जाणून घेण्यासाठी मंगळवेढ्यामध्ये बुधवारी गुप्त मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी आ. समाधान आवताडे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, जिल्हा सरचिटणीस व

विधानसभा

परिचारक समर्थकांनी उघडपणे केली उमेदवारीची मागणी

 

पक्षाच्या भूमिकेकडे लक्ष एकीकडे भाजपाने गुप्त मतदान

घेतलेले असतानाच दुसरीकडे भाजपा पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे उमेदवारीची मागणी केली आहे. त्यामुळे भाजपकडून प्रत्यक्ष उमेदव- ारी देताना गुप्त मतदानाद्वारे पडलेल्या मतांची आकडेवारी विचारात घेणार की पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या आग्रही मागणीचा विचार होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गुरुदास अभ्यंकर, लाला पानकर, नारायण सिंघण, रणजित भोसले, सुनिल भोसले, अरूण घोलप, आदींनी आमदार महेश लांडगे यांच्याकडे प्रशांत परिचारक यांना पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा महायुतीच्या उमेदवारीची मागणी केली.

पंढरपूर पक्षनिरीक्षक महेश लांडगे यांच्याकडे उमेदवारी मागणीचे निवेदन देताना भाजपाचे पदाधिकारी.

शशिकांत चव्हाण यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पंढरपूर तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवेदनाद्वारे भाजपा समर्थक पदाधिकारी पंढरपूर शहर तालुका भाजपा अध्यक्ष विक्रम शिरसट, भास्कर कसगावडे, माऊली हळवणकर, प्रशांत देशम ख, नगरसेवक अनिल अभंगराव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या