गहिनीनाथ महाराज औसेकर महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित,
गहिनीनाथ महाराज औसेकर महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित,
पंढरपूर (ता.22)
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती पंढरपूरचे सह अध्यक्ष तथा अध्यक्ष नाथ संस्थान औसा चे गहिनीनाथ महाराज औसेकर यांना आफ्टरनुन व्हाईस, मुंबई या संस्थेमार्फत महाराष्ट्र रत्न 2024 पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
दि. 21 सप्टेंबर रोजी राज्याचे शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते व सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी व आफ्टरनुन व्हाईस, मुंबईच्या संस्थापक अध्यक्षा डॉ.वैदही ताम्हण यांच्या प्रमुख उपस्थित यशवंतराव चव्हाण सभागृह, नरिमन पॉईट मुंबई येथे सदर कार्यक्रम संपन्न झाला आहे.
ओसेकर महाराज यांनी पंढरपूर ला श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांना दिलेल्या सेवा सुविधांची दखल घेत तसेच सह अध्यक्ष म्हणून मंदिर समितीकडे केलेले कार्य तसेच नाथ संस्थानचे अध्यक्ष म्हणून वारकरी संप्रदायातील पूर्वापार चालत आलेली परंपरा टिकवून पुढे वाढवत नेण्यासाठी केलेले कार्य व वारकरी संप्रदायातील योगदान विचारात घेऊन मुंबई येथील नामांकित संस्थेने पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. त्यांना यापूर्वी देखील महाराष्ट्र भूषण, मराठवाडा भूषण, हिंदुत्व के आधारस्तंभ, धर्म केसरी, धर्म भास्कर, गुरु चरण कमल चंचलिका असे 22 ते 24 पुरस्कार मिळाले आहेत.