सोलापुरातील लाडक्या बहिणींनों, लक्ष द्या ! जिल्हाधिकाऱ्यांनी केले हे आवाहन

सोलापुरातील लाडक्या बहिणींनों, लक्ष द्या ! जिल्हाधिकाऱ्यांनी केले हे आवाहन
सोलापूर, दिनांक 9(जिमाका):- जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिनांक 14 ऑगस्ट 2024 पासून पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. जिल्ह्यातील कोणत्याही बँकेने कोणत्याही कारणांस्तव लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरील पैसे कपात करू नयेत याची दक्षता संबंधित बँकांनी घ्यावी. जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांनी सर्व बँकावर या अनुषंगाने नियंत्रण व समन्वय ठेवावा. या योजनेच्या अनुषंगाने बँकेशी संबंधित कोणतीही तक्रार असेल तर प्रत्येक तालुका निहाय हेल्पलाईन क्रमांक व अधिकारी उपलब्ध करून दिलेले आहेत, त्यावर आपल्या तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तालुका निहाय संपर्क अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असून अधिकारी यांचे नाव व हेल्पलाईन क्रमांक खालील प्रमाणे देण्यात येत आहेत.

माढा – संरक्षण अधिकारी श्रीमती उज्वला कापसे मो.नं. 8308273114, विस्तार अधिकारी बंडु खेताडे मो.नं.7030384711, विस्तार अधिकारी आकाश कोकाटे मो.नं. 7030384711
बार्शी – विस्तार अधिकारी शैलेश सदाफुले मो.नं.8208213921, विस्तार अधिकारी सुरज काटकर मो.नं. 8208213921
उत्तर सोलापूर- संरक्षण अधिकारी अविनाश जेठीयाद मो.नं. 8698475808, विस्तार अधिकारी रवि पाटील मो.नं.7588046259
मोहोळ – संरक्षण अधिकारी उज्वला कापसे मो.नं.8308273114, विस्तार अधिकारी शिलादेवी दाडे मो.नं.9975567732
सांगोला- संरक्षण अधिकारी सचिन चव्हाण मो.नं.7875693241, विस्तार अधिकारी प्रविण गायकवाड मो.नं.8421910928,
करमाळा – संरक्षण अधिकारी मिथुन पवार मो.नं. 9527341147, विस्तार अधिकारी संदिप रणदिवे मो.नं.7387294383
माळशिरस – संरक्षण अधिकारी श्रीमती पी.एस.वावरे मो.नं.8788158230, विस्तार अधिकारी स्वप्नील वाघमारे मो.नं.9637983739
पंढरपूर – विस्तार अधिकारी अनंत शिंदे मो.नं.9049529797, विस्तार अधिकारी पांडुरंग कुंभार मो.नं.8275303173
दक्षिण सोलापूर – विस्तार अधिकारी ऋषीकेश जाधव मो.नं.8600798899, संरक्षण अधिकारी मिलिंद घाडगे मो.नं.9049113282
अक्कलकोट – विस्तार अधिकारी मृणाली शिंदे मो.नं.9420358355, संरक्षण अधिकारी एस.एस.कलशेट्टी मो.नं.9665673745
मंगळवेढा – पर्यवेशीका श्रीमती अनुराधा शिंदे मो.नं.9423591049, संरक्षण अधिकारी आर.आय.विजापूर मो.नं.9326527044.
तरी माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना बँकेशी संबंधित पैसे कपात व अन्य कोणतीही तक्रार असेल तर उपरोक्त संपर्क अधिकारी यांच्याशी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधावा, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात येत आहे

1 thought on “सोलापुरातील लाडक्या बहिणींनों, लक्ष द्या ! जिल्हाधिकाऱ्यांनी केले हे आवाहन

  1. We’re a group of volunteers and starting a new scheme in our community. Your website provided us with valuable info to work on. You have done a formidable job and our whole community will be thankful to you.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या