डॉक्टर निकम टुलिप्स सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री आयुष्यमान जन आरोग्य योजना यांचे उद्घाटन.

डॉक्टर निकम टुलिप्स सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री आयुष्यमान जन आरोग्य योजना यांचे उद्घाटन.
पंढरपूर प्रतिनिधी -: डॉक्टर निकम यांचे टुलिप सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल पंढरपूर यांचे वतीने आतापर्यंत अस्थिरोग व एक्सीडेंट या रुग्णावरती उपचार केले जात होते व या मागील काळात गावोगावी मोफत अस्थिरोग शिबिराचे आयोजन केले जात होते परंतु आता डॉक्टर निकम यांचे ट्यूलिप सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल डी मार्ट रोड पंढरपूर येथे गेल्या वर्षभरापासून रुग्णसेवेत उतरले आहे.
या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या म्हणजेच न्यूरो सर्जरी जनरल मेडिसिन कार्डिओलॉजी न्यूरोलॉजी हाडांचे आजार प्लास्टिक सर्जरी छातीचे आजार कांना घशाच्या आजार व त्वचेचे आजार अद्यावत, फिजिथेरपी, आयसीयू , इन्शुरन्स, असणाऱ्या पेशंटसाठी कॅशलेस सुविधा विषबाधा, जॉईंट रिप्लेसमेंट, एक्स-रे, अत्याधुनिक सिटीस्कॅन डिपार्टमेंट, अत्याधुनिक 24 तास मेडिकल सुविधा.
यावरती उपचार केले जातात परंतु आता हे सर्व उपचार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत केले जाणार आहे जे पात्र लाभार्थी असतील त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
या उद्घाटन प्रसंगी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान दादा अवताडे यांनी हॉस्पिटलला शुभेच्छा दिल्या याप्रसंगी बोलताना डॉक्टर प्रशांत निकम यांनी उपस्थित रुग्णांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत लाभ घेण्याचे आव्हान केले. या उद्घाटनाच्या निमित्त हॉस्पिटलमध्ये आज मोफत सर्व रोग निदान शिबिराच्या आयोजन केले होते या शिबिरामध्ये जवळपास 150 तपासणी करण्यात आली त्यामध्ये रुग्णांची मोफत बीएमडी तपासणी मोफत सीबीसी तपासणी मोफत शुगर तपासणी करण्यात आली व पुढील तपासणीवरती पन्नास टक्के सवलत देण्यात आली व शिबिरातील पेशंटला ऑपरेशनची गरज भासल्यास ती गरज महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून किंवा हॉस्पिटल सवलतीच्या दरात करणार असल्याचेही सांगितले.
याप्रसंगी मा.वसंत नाना देशमुख, मा.अमरजी पाटील, मा.सुभाष भोसले, मा.भारत कोळेकर, मा.उज्वला भालेराव, मा.शहाजी साळुंखे, मा.विलास भोसले, मा.किरण घाडगे, मा.दीपक वाडदेकर, मा.दिनकर कदम,मा.दिलीप चव्हाण, मा.दिनकर चव्हाण, मा.संतोष कांबळे, मा. संतोष कोकाटे, मा.बाळासाहेब माळी, मा.विनोद लटके, मा.भगवत बहिरट, मा.शहाजी मोहिते, डॉ.एकनाथ बोधले, मा.दादासाहेब देशमुख, मा.राजू पाटील, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
Somebody essentially assist to make critically articles I’d state. That is the very first time I frequented your web page and so far? I amazed with the analysis you made to create this particular publish amazing. Wonderful process!