मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: अडचण आल्यास 02186-223556 हेल्पलाईन क्रमांकावर पंढरपूर तहसिल कार्यालय येथे संपर्क साधावा – तहसीलदार सचिन लंगुटे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना:
अडचण आल्यास 02186-223556 हेल्पलाईन क्रमांकावर पंढरपूर तहसिल कार्यालय येथे संपर्क साधावा
पंढरपूर : – ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ तालुक्यातील सर्व पात्र महिलांना मिळावा यासाठी त्यांच्या अडचणी सोडविण्याकरीता पंढरपूर तहसिल कार्यालय येथे ०२१८६-२२३५५६ हा हेल्पलाईन क्रमांक सुरु करण्यात आला आहे. या योजनेतर्गंत ज्या लाभार्थ्यांना कुठल्याही अडचणी किंवा समस्या आल्यास हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन तहसिलदार सचिन लंगुटे यांनी केले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही शासनाची महत्वाकांक्षी योजना असून, त्याव्दारे पात्र लाभार्थी महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये देण्यात येतात. तालुक्यातील एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही याकरीता तालुका प्रशासन स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने अहोरात्र काम करीत आहेत. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, स्वांवलंबीकरण, आत्मनिर्भर करण्याबरोच महिलांच्या सशक्तीकरणाला चालना देण्याकरीता ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेअंतर्गत समाजातील सर्व घटकातील पात्र महिलांना प्रतिमाह १ हजार ५०० रुपयांचा लाभ देण्यात येणार असून त्याकरीता महिलांनी तात्काळ अर्ज करावे, असे आवाहन तहसिलदार सचिन लंगुटे यांनी केले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेकरीता पंढरपूर तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, या योजनेकरिता तालुक्यातून सुमारे 95 हजार महिलांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी 70 हजार लाभार्थ्यांना मान्यता देण्यात आली आहे उर्वरित 25 हजार लाभार्थ्यांची छााननी येत्या दोन दिवसांत पुर्ण करण्यात येणार आहे. यापुर्वी पात्र ठरलेल्या महिलांना १४ ऑगस्टपासून प्रत्यक्ष लाभ मिळण्यास सुरुवात झाल्यामुळे महिलावर्गात समाधानाची भावना व्यक्त होत आहे, प्रशासनाच्यावतीने प्राप्त प्रत्येक अर्जाची छाननी करण्यात आली. छाननीअंती पात्र ठरलेल्या महिलांच्या बँक खात्यात १४ ऑगस्टपासून जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून प्रत्येकी ३ हजार रुपये जमा करण्यास सुरुवात झाली आहे असे महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी समाधान नागणे यांनी सांगितले.
तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेकरीता अर्ज केलेल्या पंढरपूर तालुक्यातील 2 हजार 355 पात्र महिलांना प्रत्यक्ष लाभ घेण्यासाठी तत्काळ ईकेवायसी संबधित बॅकेत करुन घ्यावे असे आवाहनही बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री नागणे यांनी केले आहे.
I think you have mentioned some very interesting details , thankyou for the post.