प्रणिती शिंदे यांनी मंगळवेढ्यातून फुंकले लोकसभेचे रणशिंग ; 24 गावचा पाणी प्रश्न येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडणार
प्रणिती शिंदे यांनी मंगळवेढ्यातून फुंकले लोकसभेचे रणशिंग ; 24 गावचा पाणी प्रश्न येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडणार
मंगळवेढा तालुक्यातील २४ गावातील प्रमुख कार्यकर्त्यांची पाणीप्रश्नी बैठक मंगळवेढा तालुका काँग्रेस कार्यालयात आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती
मंगळवेढ़याच्या पाणी प्रश्नावर बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, यापूर्वी पाण्याचा प्रश्न अनेकदा प्रश्न उपस्थित केला होता परंतु विषय अर्धवट घ्यायचा नव्हता म्हणून मी त्यामध्ये लक्ष घातले नाही, अर्धवट माहितीवर प्रश्न मांडला असता तर अर्धवट पाणी मिळाले असते. निवडणूक असो वा नसो मी मंगळवेढा तालुक्याच्या या २४ गावातील पाण्यासाठी प्रयत्न करणार आहे, येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मी मंगळवेढ़याच्या पाणी प्रश्नावर आवाज उठविणार आहे.