65 एकरात लाखांवर भाविक दाखल: प्रशासन सज्ज 497 प्लॉट पैकी 278 चे वाटप, 106 दिंड्या दाखल प्रांताधिकारी गजानन गुरव

65 एकरात लाखांवर भाविक दाखल: प्रशासन सज्ज
497 प्लॉट पैकी 278 चे वाटप, 106 दिंड्या दाखल
प्रांताधिकारी गजानन गुरव

पंढरपूर दि.21:- कार्तिकी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा गुरुवार दि. 23 रोजी साजरा होत आहे. एक दिवसावर सोहळा येवून ठेपला आहे. त्यामुळे संताचे लहान मोठे पालखी सोहळे पंढरपूर नजीक दाखल झाले आहेत. तर येथील 65 एकर येथे देखील

लाखांवर भाविक दाखल झाले आहेत. येथील 497 पैकी 278 प्लॉटचे बुकींग देखील पुर्ण झाले आहे. भाविक राहुट्या, तंबू, मंडप उभारुन वास्तव्य करु लाागले आहेत. 65 एकरात भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिली.

कार्तिकी यात्रेसाठी चंद्रभागात नदीवाळवंटात उभारण्यात येत असलेल्या राहुटयांना चंद्रभागा नदीपलीकडील 65 एकरात दिंड्यांना राहण्यासाठी प्रशासनाकडून जागा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. येथील सर्वच्या सर्व 497 प्लॉटचे वाटप

करण्यात येणार आहे. मंगळवार दि. 21 रोजी दुपारी 278 प्लॉटचे वाटप करण्यात आले असून 106 दिंड्या दाखल झाल्या आहेत. तर येथे 1 लाख 90 हजार 10 भाविक दाखल झाले आहेत. सद्या तंबू, राहुट्या उभारून भाविक येथे वास्तव्य करत आहेत. भजन, कीर्तन व प्रवचनात भाविक दंग झाले असल्याने भक्ती सागर विठ्ठल भक्तीत दंग झाल्याचे चित्र दिसून येते.

पंढरपूर नगरपालिकेच्यावतीने या परीसरात कायम स्वरुपाची 800 शौचालये तर तात्पुरती 400 शौचालये उभारण्यात आली आहेत. पिण्यासाठी नळाव्दारे पाणी, पाण्याचे टँकर उभारण्यात आले आहेत. तर लाईटची सुविधा मोफत दिली आहे.

विजवितरण कडून 20 जोडण्यात देण्यात आल्या आहेत. तर गॅस जोडणी देखील देण्यात येत असून तपासणी केलेल्यांची संख्या 20 आहे. 65 एकर येथे सुरक्षा, वैद्यकीय सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आल्याने भाविकांची गैरसोय थांबली आहे. भजन, किर्तनाची सेवा येथेच पार पाडली जात असल्याने भक्तीसागरात भक्तीमय वातावरण तयार झाले आहे. येथे अत्यावश्यक सेवासुविधा पुरवण्याबरोबर खासगी दुकानदारांनी प्रासादिक साहित्याची दुकाने, हॉटेल, खेळणी आदींची दुकाने उभारण्यात आली आहेत.

सोमवार पासून 65 एकरात दिंडया वास्तव्यास येवू लागल्या आहेत. तर मंगळवारी येथील 278 प्लॉटचे वाटप पुर्ण केले आहे. भाविक तंबू, राहुट्या उभारत या ठिकाणी भाविक वास्तव्य करु लागले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून येथे भाविकांना मोफत जागा, पिण्याचे शुद्ध पाणी, वीज, प्रथमोपचार सेवा, पोलिस संरक्षण आदी सुविधा पुरण्यात आल्या आहेत.

भाविकांना 24 तास सेवा देण्यासाठी येथे आपत्कालीन मदत केंद्र कार्यरत ठेवण्यात आले असल्याचे प्रांताधिकारी गुरव यांनी सांगितले.

Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या