इंदापुर तालुक्यात कोरोनाचा धुमाकूळ; पुन्हा निमगावात वाढली डोकेदुखी 3 रुग्णांची भर!

इंदापुर |इंदापूर तालुक्यात ज्या वेळेस पासून कोरोनाने शिरकाव केला आहे त्यावेळस पासून रोज वेगवेगळ्या भागात दररोज कोरोना चे रुग्ण आढळत आहेत. आज सकाळी 24 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर दुपारी आलेल्या अहवालात काल घेतलेल्या 11 नमुन्यांपैकी पाच जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

यामध्ये निमगाव केतकीतील 3 रुग्णांसह कळाशी येथे 1 व भिगवण येथे पुन्हा 1 जण कोरोना बाधित आढळला आहे. इंदापूर उपजिल्हा रूग्णालय प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे यांनी ही माहिती दिली. काल भिगवण, कळाशी व निमगाव केतकी येथील कोरोना ग्रस्तांच्या संपर्कातील जवळच्या नातेवाईकांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यामध्ये 6 जण निगेटिव्ह आले
असून 5 जण पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान आज सकाळी आलेल्या अहवालामध्ये 29 पैकी 25 जण निगेटिव्ह आले होते. सणसर येथील कोरोनाग्रस्ताच्या संपर्कातील 14 जणांचे अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहेत.

Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या