माँ साहेब जिजाऊ वृद्धाश्रमाच्या उभारणीसाठी संजय ननवरे यांची मोलाची मदत

इतरही सेवाभावी व्यक्ती संस्थांनी मदतीसाठी पुढे येण्याचे केले आवाहन

अनाथांच्या उद्धारास लावला हातभार

आश्रमचालकांनी मानले शतशः आभार

पंढरपूर (प्रतिनिधी)

समाजउपयोगी कामासाठी कोणाचीही हाक येऊद्या , अर्ध्या रात्री एका पायावर उभा असणारे व्यक्तिमत्व म्हणून संजयबाबा ननवरे यांच्याकडे तालुक्यातील नागरिकांची नजर आहे. याच नजरेतून पिराची कुरोली येथील आश्रम चालकांचा संजय बाबा ननवरे यांना फोन आला, त्यांना बोलावून घेत त्यांनी तातडीने त्यांची गरज भागवली. एवढ्यावरच न थांबता पंढरपूरकरांना या आश्रमासाठी मदत करण्याचे आवाहनही केले. ही घटना शनिवारी दुपारी घडली असून, या घटनेचे पडसाद पंढरपूर तालुक्यातील सामाजिक जीवनावर पडले आहेत.

पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली येथे मासाहेब जिजाऊ अनाथ आणि अपंग आश्रमाचे बांधकाम सुरू आहे. अनेक महिलांनी मिळून हे बांधकाम सुरू केले आहे. या बांधकामाची मुहूर्तमेढ रोवताना, समाजातील विविध घटकांची मदत त्यांना होत आहे. यातील महिला चालकांना समाजसेवक संजयबाबा ननवरे यांच्याबाबत माहिती मिळाली. दोनच दिवसापूर्वी त्यांनी संजय ननवरे यांना फोन केला. आश्रमाच्या बांधकामासाठी सिमेंटची कमी आहे. ही गरज भागवण्याची विनंती केली. संजय ननवरे यांनी शनिवारी त्यांना फोन करून पंढरपूरमध्ये बोलावून घेतले. किती सिमेंट पाहिजे याची खात्री करून, दुकानातून सिमेंट खरेदी करून, या गाडीची रवानगी आश्रमाकडे केली. या मदतीमुळे आश्रमचालक महिला खुश झाल्या. त्यांनी संजय बाबा ननवरे यांना हात जोडून आभार मानले.

सामाजिक मदतीतून करावयाचे काम कोणा एकाच्या मदतीवरून होत नाही, हे माहीत असलेल्या संजय ननवरे यांनी, पिराची कुरोली येथील आश्रमाच्या बांधकामाची जाहिरातही केली. महिलांकडून उभारण्यात येत असलेल्या या आश्रमाच्या बांधकामास पंढरपूरकरांनी आपापल्या परीने हातभार लावावा अशी विनंतीही केली.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!