सहकार श‍िरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहिर

सहकार श‍िरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहिर
सोलापूर:- सहकार श‍िरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लि.चंद्रभागानगर, पो.भाळवणी, (ता.पंढरपूर ) या सहकारी साखर कारखान्याची संचालक मंडळाची निवडणूक 2023-24 ते 2028-29 हा कार्यक्रम जाहिर झाला आहे. 21 संचालक निवडीसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला आहे. 16 जून 2023 रोजी सकाळी 8.00 ते सायंकाळी 5.00 यावेळेत मतदान होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उप जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी भारत वाघमारे यांनी दिली.
या निवडणूकीसाठी नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी, प्रांताधिकारी कार्यालय येथील सभागृह, पंढरपूर येथे 12 ते 18 मे 2023 याकालावधीत सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत मिळणार आहेत. मिळालेल्या नामनिर्देशन पत्राची यादी त्या त्या दिवशी प्रसिध्द करण्यात येणार आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी 19 मे 2023 रोजी सकाळी 11.00 वाजले पासूण करण्यात येणार आहे. जे नामनिर्देशन पत्र ग्राह्य होतील त्याची यादी 22 मे 2023 रोजी निवडणूक निर्णय अध‍िकारी यांच्या कार्यालयात व संस्थेच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात येणार आहे.
उमेदवारांना नामनिर्देशन पत्र 22 मे ते 05 जून 2023 या कालावधीत सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत मागे घेता येतील. निवडणूक चिन्हाचे वाटप 06 जून 2023 करण्यात येणार आहे. मतदान 16 जून रोजी होणार असून, शासकीय धान्य गोदाम, पंढरपूर येथे मतमोजणी आणि निकाल 18 जून 2023 रोजी घोषित करण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उप जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी भारत वाघमारे यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!