सांगोला तालुक्यातील जवळा येथील हददायक प्रकार. वावटळीने दोन वर्षाची मुलगी हवेत उडाली.जागेवर मृत्यू.

जवळा येथील हददायक प्रकार. वावटळीने दोन वर्षाची मुलगी हवेत उडाली.जागेवर मृत्यू.

घेरडी- आज दुपारी अचानक आलेल्या वावटळीने जवळा -घेरडी रोडलगत असलेल्या मरीआई -गाडीवाले यांच्या पालावर हि घटना घडली. सोनंद येथील रहिवासी असलेल्या साधु चव्हाण यांच्या दोन वर्षाची कन्या कस्तुरी साधु चव्हाण यांच्या मुलीचा पाळणा वावटळीने 400फुट उडाल्याने नंतर खाली दगडावर पडुन जागीच मृत्यू झाला. साधु चव्हाण यांची सासरवाडी जवळा असुन आज दवाखान्याला ते दापत्य आपल्या मुलीला घेऊन आले होते. परंतु अचानक नैसर्गिक बदलामुळे आलेल्या वावटळीने एका चिमकुलीचा जीव घेतला आहे. यावेळी बघ्याची मोठी गर्दी झाली होती. सदर घटनेची माहिती मिळताच महसूल प्रशासनाने पंचनामा केला आहे.सदर घटनेची नोंद पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!