नॅशनल तायक्वांदो स्पर्धेत दिव्या स्पोर्ट्स क्लबमधील विद्यार्थ्यांचे यश यशस्वी विद्यार्थ्यांचा उमेश परिचारक यांच्या हस्ते सन्मान

नॅशनल तायक्वांदो स्पर्धेत दिव्या स्पोर्ट्स क्लबमधील विद्यार्थ्यांचे यश

यशस्वी विद्यार्थ्यांचा उमेश परिचारक यांच्या हस्ते सन्मान

पंढरपूर (प्रतिनिधी)

दिल्ली येथे पार पडलेल्या नॅशनल तायक्वांदो स्पर्धेत पंढरपूरमधील दिव्या स्पोर्ट्स क्लबमधील 12 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. या स्पर्धेत 12 पदकांची कमाई केलेल्या या विद्यार्थ्यांचा सन्मान उमेश परिचारक यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी दिव्या स्पोर्ट्स क्लबचे चालक महेश गावडे हेही उपस्थित होते.

दिल्ली येथील इंदिरा गांधी स्टेडियम मध्ये 15 आणि 16 एप्रिल रोजी नॅशनल तायक्वांदो स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करत असताना पंढरपूरमधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत 12 पदकांची कमाई केलेल्या विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान पंढरपूरमध्ये करण्यात आला. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात या विद्यार्थ्यांना उमेश परिचारक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या स्पर्धकांमध्ये समृद्धी वाघ, तेजस्विनी राऊत, प्रांजली वाघमारे, वरद जवंजाळ, वीर पवार, अमन शेख, पद्मनाभ सिंगन, अंतरा कौलगे आणि श्रेयांश सिंघण इत्यादी नऊ विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

पंढरपूरमधील दिव्य स्पोर्ट्स क्लबमध्ये भरपूर सराव झाला. शिक्षकांचे भरपूर मार्गदर्शन लाभले. यामुळेच हे यश संपादन करता आल्याची प्रतिक्रिया यावेळी या स्पर्धकांकडून देण्यात आली. उमेश परिचारक यांनी या स्पोर्ट्स क्लबचे चालक महेश गावडे सर
यांचेही अभिनंदन केले.

याप्रसंगी गणेश सिंघण, तुकाराम राऊत, सिद्धेश्वर थोरात, संग्राम अभ्यंकर, नवनाथ रानगट, सुभाष मस्के सर, प्रतापसिंह देवकर, नारायण शिंगण, श्याम शिंगण, केशव भोसले, चारुदत्त ताठे, राहीरकर सर, आबा नवले, दिनेश गावडे, बाळासाहेब थोपटे, अमीर शेख, आनंद भोसले, सौ. मोक्षदा राऊत, सौ प्रियंका सिंघन, रागिनी दळवी, तेजस्विनी सावंत यांच्यासह पंढरपूरमधील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!