तोतया वाहतूक पोलिसाची पैशासाठी वाहने अडवून दमदाटीभोसे येथील प्रकार, करकंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

तोतया वाहतूक पोलिसाची पैशासाठी वाहने अडवून दमदाटी
भोसे येथील प्रकार, करकंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पंढरपूर तालुका प्रतिनिधी: महाराष्ट्र पोलिसांचा ‘लोगो’ लावलेली मोटरसायकल जवळ बाळगून आणि वाहतूक पोलीस असल्याचे भासवून ये- जा करणाऱ्या मोटरसायकली अडवत लायसन कागदपत्राची तपासणी करून पैशासाठी दमदाटी करणाऱ्या तोता पोलिसांविरुद्ध करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे तोतयेगिरीचा हा प्रकार शुक्रवारी दिनांक 14 सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास भोसे पाटील ते करकंब या मार्गावर निदर्शनास आला .

समाधान गोरख मढे वय 30 राहणार शिर्डी जिल्हा अहमदनगर असे गुन्हा दाखल झालेल्या तोतया वाहतूक पोलिसाचे नाव आहे त्याच्या विरोधात समाधान बंडू बनकर राहणार करकंब त्यांनी फिर्यादी दाखल केली आहे यातील फिर्यादी बनकर हे शुक्रवारी सायंकाळी आपल्या मोटरसायकल वरून भोसे पाटील ते करकंब या रस्त्याने निघाली असताना समाधान मढे यांनी त्यांना अडविले त्यानंतर वाहन चालविण्याचा परवाना व इतर कागदपत्राची मागणी केली यावेळी बनकर यांच्या मोटर सायकलला नंबर नसल्याने दम देऊन तो पैसे मागू लागला तसेच जबरदस्तीने त्यांच्या शर्ट व पॅन्टचे खिसे तपासून लागला.

यादरम्यान मढे यांनी इतरही काही मोटरसायकली अडविल्याची बनकर यांना दिसून आले. मढे यांच्याकडे डीलक्स मोटरसायकल होती आणि पुढच्या बाजूला महाराष्ट्र पोलीस असे लिहिलेले होते महाराष्ट्र पोलिसांचा लोगोही लावलेला होता या आधारे मढे हा पोलिसा सेवेत नसताना तो वाहतूक पोलीस असल्याचे भासवून रस्त्यावरून ये जा करणाऱ्या मोटरसायकली अडवून संबंधितांचे वाहने चालवण्याची परवाने व वाहनांचे कागदपत्र मागून तपासणी करीत होता याविषयी शंका आल्याने बनकर यांनी करकंब पोलिसांशी संपर्क साधून फिर्यादी दाखल केली पोलिसांनी मढे याला ताब्यात घेतली या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक फुगारे हे करीत आहेत.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!