शेतीच्या वादातून महूदमध्ये शेतकरी कुटुंबातील चौघांना बेदम मारहाण

शेतीच्या वादातून महूदमध्ये शेतकरी कुटुंबातील चौघांना बेदम मारहाण
सांगोला (तालुका प्रतिनिधी): बेकायद्याची मंडळी जमवून वहीवटीत असलेल्या शेतजमीनीचा ताबा घेण्याच्या उद्देशाने दोन ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतीमध्ये नांगरट करू लागले. तुम्ही आमच्या शेतामध्ये का नांगरता अशी विचारणा केली असता पाच जणांनी मिळून एकाच कुटुंबातील शेतकर्‍यासह, त्याची पत्नी, दोन मुले यांना लाकडी काठीने, पाईपने, केबलने, हाताने, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करुन शिवीगाळ, दमदाटी केली. तसेच मारहाणीच्या घटनेचे चित्रीकरण करणार्‍या मुलाचा मोबाईल फोडून टाकला. ही घटना ३प नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास मेटकरवाडी नं.२ , महूद ता.सांगोला येथे घडली. याप्रकरणी रामचंद्र भाऊ क्षिरसागर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शंकर शिवाजी पाटील, पप्पू शिवाजी बंडगर, किसन येडगे, तातोबा ढाळे, पिंटु शिवाजी पाटील सर्व रा.महुद ता.सांगोला व इतर चार ते पाच अनोळखी लोकांविरूध्दसांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास रा.मेटकरवाडी नं.२, महूद येथील रामचंद्र भाऊ क्षिरसागर हे घरी असताना शेजारी राहणारे शंकर शिवाजी पाटील, पप्पू शिवाजी बंडगर, किसन येडगे, तातोबा ढाळे, पिंटु शिवाजी पाटील व इतर चार ते पाच अनोळखी लोक दोन बिगर नंबरचे ट्रॅक्टर घेऊन येत रामचंद्र क्षीरसागर वहीवाटत असलेल्या शेतीमध्ये नांगरु लागले. त्यावेळी रामचंद्र क्षीरसागर यांनी आमच्या शेतामध्ये का नांगरता अशी विचारणा केली असता शंकर पाटील याने ही शेती जमीन मी तुझ्या भावाकडुन विकत घेतलेली आहे असे सांगितले. त्यानंतर शंकर पाटील, पप्पू बंडगर, किसन येडगे, तातोबा ढाळे व इतर चार ते पाच अनोळखी लोकांनी बेकाद्याची मंडळी जमवुन शेतीचा ताबा घेण्याच्या उद्देशाने त्यातील शंकर पाटील याने तु मला जमीन कशी देत नाही तुला बघुनच घेतो असे म्हणुन रामचंद्र क्षीरसागर यांना पाईपने मांडीवर व मानेवर मारहाण केली.
त्यावेळी मुलगा निलेश हा मोबाईलमध्ये मारहाणीचे छायाचित्रण करत असताना त्यास पाईप व केबलने छातीवर,पाठीवर व डाव्याहातावर मारहाण करत त्याच्या हातातील मोबाईल दगडाने फोडुन टाकला. त्यानंतर तुम्हाला लय मस्ती आहे असे म्हणुन पप्पु बंडगर याने त्याच्या हातातील लाकडी काठीने मुलगा निलेश यास पाठीवर मारहाण केली. तसेच किसन येडगे व तातोबा ढाळे यांनी रामचंद्र यांना धकाबुक्की करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. रामचंद्र क्षीरसागर यांची पत्नी वनिता व मुलगी मयुरी या दोघी सदरचे भांडण सोडवण्यासाठी आल्या असता त्यांना दोन अनोळखी इसमांनी तुम्ही येथे भांडणामध्ये यायचे नाही असे म्हणून काठीने पत्नी वनिता हिच्या उजव्या हातावर मारहाण केली. त्याचवेळी रामचंद्र यांचा लहान मुलगा कल्याण हा कॉलेजमधून घरी आला असता त्यास पप्पु बंडगर याने पाईपने तर शंकर पाटील व एका अनोळखी इसमाने हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर शंकर पाटील यांनी तुम्ही केस केल्यास मी तुम्हाला बघुन घेतो असे म्हणुन धमकी देवुन निघुन गेले. याप्रकरणी रामचंद्र भाऊ क्षिरसागर यांनी शंकर शिवाजी पाटील, पप्पू शिवाजी बंडगर, किसन येडगे, तातोबा ढाळे, पिंटु शिवाजी पाटील सर्व रा.महुद ता.सांगोला व इतर चार ते पाच अनोळखी लोकांविरूध्द सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!