करकंब जवळ मोटारसायकलच्या धडकेत एकाचा मृत्यू

करकंब जवळ मोटारसायकलच्या धडकेत एकाचा मृत्यू
पंढरपूर – पाठीमागून येत असलेल्या मोटारसायकलची धडक बसून झालेल्या अपघातात दुसर्‍या मोटारसायकल वरील व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात पंढरपूर तालुक्यातील करकंब गावा जवळील व्यवहारे पाटी जवळ घडला.
दत्तात्रय बाबुराव कोरके (वय.६० रा.भोसे) अस अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. कोरके हे त्यांच्या मोटारसायकल वरुन जात असताना त्यांच्या गाडीस मागून येत असलेल्या मोटारसायकलची धडक बसली. यात गाडीवरुन पडून त्यांचा जबर जखमी होवून मृत्यू झाला. करकंब पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!