पंढरपुर सिंहगड म्हणजे अभियांत्रिकी शिक्षणाचे वैभवशाली ज्ञान संकुल स्मार्ट महाविद्यालय, स्मार्ट इंजिनिअर फक्त आणि फक्त पंढरपूर सिंहगड मध्येच!

पंढरपुर सिंहगड म्हणजे अभियांत्रिकी शिक्षणाचे वैभवशाली ज्ञान संकुल
स्मार्ट महाविद्यालय, स्मार्ट इंजिनिअर फक्त आणि फक्त पंढरपूर सिंहगड मध्येच!
पंढरपूर: प्रतिनिधी-कोर्टी (ता. पंढरपुर) सारख्या ग्रामीण भागात उभारण्यात आलेल्या पंढरपुर सिंहगड इन्स्टिट्युटने अल्पावधीतच सोलापुर जिल्ह्यातच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभियांत्रिकी शिक्षणात वैभवशाली शैक्षणिक संकुल असल्याचे सिद्ध केले आहे. पंढरपुर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय म्हणजे अभियांत्रिकी शिक्षणाचा बादशहा आहे.
सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी, पंढरपूर महाविद्यालयातील विद्यार्थी आज प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. सोलापूर विद्यापीठाच्या वतीने प्रत्येक वर्षी वार्षिक परीक्षा घेण्यात येतात. या परीक्षेत सोलापुर विद्यापीठाअंतर्गत असलेल्या सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयामधून पंढरपुर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी सलग मागील शैक्षणिक वर्षात तीन वर्षे प्रथम क्रमांकाचा आहे. हा पंढरपुर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचा इतिहास आहे. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता सामाजिक बांधिलकी, सामाजिक भान, राष्ट्राच्या, समाजाच्या हितासाठी, उन्नतीसाठी व प्रगती कडे घेऊन जाणारे शिक्षण पंढरपुर सिंहगड मध्ये दिले जात आहे.
पंढरपुर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अगदी माफक फी मध्ये जागतिक दर्जाच्या सर्व सेवा- सुविधा विद्यार्थ्यांना दिल्या जात आहेत. विशेषतः विद्यार्थ्यांचे कौशल्य ओळखुन त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाने आंतरराष्ट्रीय सिंहगड सोलार व्हेईकल चॅम्पियन शिप आयोजित करणारे पंढरपुर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय हे महाराष्ट्रातील एकमेव महाविद्यालय आहे.
पंढरपुर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांच्या हितासाठी व गुणवत्तेसाठीच प्रयत्न करीत आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय नेहमीच अग्रेसर आहे. राष्ट्रीय मुल्यांकन परिषद म्हणजे नॅक समिती कडून ए ग्रेड मिळविणारे सोलापूर जिल्ह्यातील पहिले एकमेव अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात कुशल, अनुभवी व तज्ञ प्राध्यापक असून अनके प्राध्यापक पी.एच.डी. धारक आहेत. या शिक्षणाचा फायदा सिंहगडमध्ये शिक्षण घेत असणा-या विद्यार्थ्यांना होत आहे. पंढरपुर सिंहगड म्हणजे अभियांत्रिकी शिक्षणाचे वैभवशाली ज्ञानसंकुल आहे.
पंढरपुर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या दर्जेदार व गुणवत्तेमुळे आज पंढरपुरातच नव्हे तर जिल्ह्यात प्रसिद्ध असल्याने विद्यार्थ्यांचा ओढा पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग कॉलेज कडे असल्याचे दिसुन येत आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!