स्वेरी’ च्या तब्बल ११ विद्यार्थीनींची ’ऍटोस’ कंपनीत निवड वार्षिक परीक्षेच्या निकालाबरोबरच स्वेरीची प्लेसमेंटमध्ये देखील आघाडी

स्वेरी’ च्या तब्बल ११ विद्यार्थीनींची ’ऍटोस’ कंपनीत निवड
वार्षिक परीक्षेच्या निकालाबरोबरच स्वेरीची प्लेसमेंटमध्ये देखील आघाडी
पंढरपूरः ऍटोस’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील तब्बल ११ विद्यार्थीनींची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.
ऍटोस’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीच्या निवड समितीने गोपाळपूर येथील इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. या निवड प्रक्रियेतुन अंतिम वर्षातील मनाली सुनील राजमाने, अश्विनी मारुती पाटील, दिपिका ज्ञानेश्वर नामदास, क्रांती संजय सिद्धगणेश, स्नेहल शिवाजी कसबे, सोयराबाई उत्तरेश्वर पाटील, स्नेहल बाळासाहेब डुचाळ, योगिता जितेंद्र आठवले, श्रुती यशवंत तावसे, वैष्णवी जयसिंग मोरे व पूजा रामचंद्र शेळके या ११ विद्यार्थीनींची निवड केली असून यांना वार्षिक तीन लाख रु. इतके पॅकेज मिळाले आहे. विशेष बाब म्हणजे विद्यार्थिनींनी देखील प्लेसमेंटमध्ये आघाडी मारली आहे त्यामुळे पालकांना विशेष आनंद होत आहे. श्री. विठ्ठल अभियांत्रिकीमध्ये विविध आंतरराष्ट्रीय कंपन्या येत असतात आणि पात्र विद्यार्थ्यांची निवड करत असतात. विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये स्वेरीचे विद्यार्थी आपले उत्तम करिअर घडवीत आहेत. संबधित विद्यार्थ्यांना पदवीच्या तिसर्‍या वर्षापासूनच विशेष प्रशिक्षकांद्वारे बहुमोल प्रशिक्षण दिले जाते. स्वेरीमध्ये वार्षिक परीक्षेचा निकाल, संशोधने, मानांकने, इन्फ्रास्ट्रक्चर याबरोबरच विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून करिअरच्या दृष्टीने सर्वात महत्वाच्या समजल्या जाणार्‍या प्लेसमेंटकडे देखील अधिक लक्ष दिले जाते व मोठमोठ्या कंपन्यांना हवे तसे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी घडविण्यासाठी प्रशिक्षित तज्ञांकडून उत्कृष्ठ मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे प्लेसमेंट मध्ये देखील स्वेरीने आघाडी घेतली असल्याचे दिसून येते. स्वेरीमध्ये शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध झाल्यामुळे विशेषतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त, कॅम्पस इनचार्ज, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांनी कॅम्पस इंटरव्ह्यूमधून ऍटोस कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थीनींचे अभिनंदन केले.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!