युवा पत्रकार गणेश महेंद्र देशमुख यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार दर्पणरत्न पुरस्कार जाहीर

युवा पत्रकार गणेश महेंद्र देशमुख यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार दर्पणरत्न पुरस्कार जाहीर

पंढरपूर (प्रतिनिधी) : ईश्वर वठार ता.पंढरपुर येथील पत्रकार गणेश महेंद्र देशमुख यांना पत्रकारीता क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल अत्यंत मानाचा समजला जाणारा राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासंमेलन 2021आयोजित “मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी” यांच्या वतीने दिला जाणारा “राज्यस्तरीय आदर्श पत्रकार दर्पणरत्न 2021” हा पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती मुंबई येथील मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीचे संस्थापक-अध्यक्ष अॅड.कृष्णाजी जगदाळे यांनी दिली. हा राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासंमेलन दि.24 डिसेंबर 2021 रोजी पुणे येथे मोठ्या उत्साही वातावरणात साजरे होणार आहे. हा पुरस्कार गणेश देशमुख यानी गेल्या दोन वर्षांपासून पत्रकारीक्षेत्रात केलेल्या कार्यामुळे हा राज्यस्तरीय आदर्श दर्पणरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे या पुरस्काराचे स्वरूप आकर्षक सन्मानचिन्ह, लक्षवेधी गौरवपदक, विशेष महावस्त्र,खास मानपत्र, मानकरी बॅच आणि मानाचा फेटा असे असून नामवंत पाहुण्यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. गणेश देशमुख हे साप्ताहिक धनगर शक्ती मध्ये पंढरपूर प्रतिनिधी म्हणून काम करत होते प्रतिनिधी म्हणून काम करत असताना त्यांच्या कामाची पद्धत व प्रत्येक विषयांमध्ये सक्रिय सहभाग असणारे प्रतिनिधी म्हणून गणेश देशमुख यांना ओळखले जाऊ लागले त्याच्या या कार्याची दखल घेत साप्ताहिक धनगर शक्तीचे संपादक ॲड. आकाश पुजारी यांनी पश्चिम महाराष्ट्र उपसंपादक हि मोठी जबाबदारी गणेश देशमुख यांना दिली हि जबाबदारी मोठ्या जिद्दीने गणेश देशमुख संभाळत आहेत तसेच ते पंढरपूर तालुक्यातील पत्रकार संघात युवा पत्रकार कार्य करत आहेत आणि या सर्व कार्याबद्दल गणेश देशमुख यांना राज्यस्तरीय आदर्श दर्पणरत्न पत्रकार हा पुरस्कार मिळाला आहे हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मुंबई येथील मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीचे संस्थापक-अध्यक्ष अॅड कृष्णाजी जगदाळे,संमेलनाचे समारंभाध्यक्ष – पद्मश्री डॉ. विजयकुमार शहा व नागरिकांकडून गणेश देशमुख यांचे अभिनंदन केले जात आहे या पुरस्कार वितरण सोहळ्याला मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीचे संस्थापक-अध्यक्ष अॅड कृष्णाजी जगदाळे , संमेलनाचे समारंभध्यक्ष पद्मश्री डॉ. विजयकुमार शहा , सामाजिक , राजकीय , शैक्षणिक , सांस्कृतिक , पत्रकार या क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनी उपस्थित राहून पत्रकार गणेश देशमुख यांचा सम्मान होणार आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!