मालट्रकने मोटारसायकलला जोराने धडक दिल्याने मोटारसायकलवरील वृद्ध पती -पत्नीचा जागीच मृत्यू

मालट्रकने मोटारसायकलला जोराने धडक दिल्याने
मोटारसायकलवरील वृद्ध पती -पत्नीचा जागीच मृत्यू
मोहोळ(तालुका प्रतिनिधी)ः गावाकडे आलेले पती पत्नी मोटारसायकल वरून सोलापूरकडे जाताना वडवळपाटी जवळ कोळेगांव हद्दीत काळाने घाला घातला , सोलापूरकडे भरधाव वेगाने जाणार्‍या एका मालट्रकने मोटारसायकलला पाठीमागुन जोराने धडक दिल्याने मोटारसायकलवरील वृद्ध पती -पत्नीचा जागीच मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी दुपारी सव्वा एकच्या दरम्यान घडली.
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मुळगांव कोंबडवाडी येथील एस आर पी चे रिटायर्ड कर्मचारी अर्जुन नामदेव थिटे व पत्नी अनिता नामदेव थिटे हे दोघे ही सध्या सोरेगांव येथे राहतात दि २१ नोहेंबर रोजी गावी पुतण्याचे लग्ण आसल्याने ते गावाकडे आले होते . पुतण्याचे लग्ण आटोपून एक दिवस राहुन गावाकडील शेती सह अन्य कामे उरकुन दि २३ रोजी ते मोटार सायकल एम .एच.१३ ए के ७३३२ वरुन सोलापूरकडे जात असता पुण्या हुन सोलापुर कडे जाणारा मालट्रक क्रंमाक ए .पी .३९ व्ही ६८२९ या ट्रकने वडवळ पाटीजवळ पाठीमागुन मोटार सायकलला जोराने धडक दिल्याने मोटार सायकल वरील अर्जुन नामदेव थिटे ( वय ६५ ) व अनिता नामदेव थिटे ( वय ६० ) हे दोघे पती पत्नीचा जागीच ठार झाले भरदाव वेगाने जानार्‍या ट्रकने जोराची धडक दिल्याने घटनास्थळावर मृतदेहाचे तुकडे अत्यावस्त विखुरल्याचे चित्र दिसत होते . याबाबतची खबर पोलीसांना मयताचे पुतणे सचिन शंकर थिटे यांनी दिली असुन मालट्रकच्या चालकास अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्ट्रेबल विजय माने करीत आहेत.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!