बेकायदेशीर फ्रूट बियरची विक्री ; तिघांवर गुन्हा

बेकायदेशीर फ्रूट बियरची विक्री ; तिघांवर गुन्हा
सोलापूर (प्रतिनिधी) बेकायदेशीररित्या फ्रूट बियरची विक्री केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध सलगर वस्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी प्रमोद सिद्राम गायकवाड (नेमणूक सलगर वस्ती पोलिस ठाणे,सोलापूर शहर) यांनी सलगर वस्ती पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.त्यांच्या फिर्यादीवरून सुमन राम गायकवाड (रा.कावळा गल्ली,सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर ५,वांगी रोड,सोलापूर),अंबादास लक्ष्मण जाधव (रा.१३२०, लिमयेवाडी वांगी रोड,सोलापूर) व पोगुल सेठ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,सुमन राम गायकवाड हिने श्री सुपरस्टार फ्रूट बियर विक्री करिता जवळ बाळगलेले असून,कंपनीच्या कोणतेही लेबल लावलेले नसून एक्सपायर डेट संपली असताना बेकायदेशीर रित्या विक्री करताना मिळून आले आहेत.असे फिर्यादीत म्हटले आहे.या घटनेची नोंद सलगर वस्ती पोलिस ठाण्यात झाली असून,या घटनेचा पुढील तपास पोसई कवडे हे करीत आहेत.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!