ट्रकची ट्रॅव्हल्स बसला धडक

ट्रकची ट्रॅव्हल्स बसला धडक

सोलापूर (प्रतिनिधी) ट्रक चालकाने अतिवेगाने वाहन चालवून ट्रॅव्हल्स बसला धडक दिल्याची घटना दि.२२ नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सोलापूर एसटी स्टँड समोर घडली.याप्रकरणी काशिनाथ भगवंत हुगार (फुलारी) (वय-३०,एन जी चाळ,गणपती मंदिर जवळ सोलापूर) यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.त्यांच्या फिर्यादीवरून ट्रक क्र.एम.एच.१३.आर.३८२० या ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,ट्रक चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रक हे अती वेगाने चालवून फिर्यादी यांच्या ट्रॅव्हल्स क्र.के.ए ५१. ए.जी.०२३८ ला पाठीमागून धडक दिली.त्यानंतर बसच्या मागील टेल लॅम्प,डिक्की,आपत्कालीन दरवाजा,मागील काच,स्पीकर कोचचे पाच सीट चिमटून फुटून नुकसान केले आहे.तसेच बस मधील प्रवाशांना हादरा बसून मुक्का मार लागून जखमी होण्यास कारणीभूत झाला आहे.असे फिर्यादीत म्हटले आहे.या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलिस ठाण्यात झाली असून,या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक पैकेकरी हे करीत आहेत.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!