शेतकर्‍याच्या खिशातून ३२ हजारांची रोकड लंपास

शेतकर्‍याच्या खिशातून ३२ हजारांची रोकड लंपास
सांगोला (तालुका प्रतिनिधी): अज्ञात चोरट्याने शेतकर्‍याच्या खिशातून ३२ हजार रुपये व मोबाईल चोरून नेल्याची घटना आठवडा बाजारातील भाजी मंडई घेतली आहे. याबाबत भाऊसाहेब ईश्वर वाघमोडे रा. घेरडी ता.सांगोला यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी घेरडी ता.सांगोला येथील भाऊसाहेब ईश्वर वाघमोडे हे २१ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरणार्‍या जनावरांच्या बाजारात शेळ्या विकण्यासाठी आले होते. शेळ्या विकून आलेली ३२ हजार रुपयांची रक्कम खिशात ठेवून आठवडा बाजारात भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेले होते. दरम्यान भाजी खरेदी करत असताना अज्ञात चोरट्यांनी भाऊसाहेब वाघमोडे यांच्या खिशातील ३२ हजार रुपये व मोबाईल लंपास केला. याबाबत भाऊसाहेब ईश्वर वाघमोडे यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध सांगोला पोलीस फिर्याद दिली आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!