सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरात आढळला बेवारस मृतदेह

सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरात आढळला बेवारस मृतदेह
सोलापूर : रेल्वे स्टेशन पासून जवळच असलेल्या रेल्वे कॉलनीच्या मागील झाडाझुडपात एक इसमाचा नग्नावस्थेत मृतदेह आढळला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण होते.
शनिवारी सकाळच्या सुमारास परिसरातील नागरिकांकडून पोलिसांना बेवारस मृतदेह दिसल्याची माहिती मिळाली, त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी पाहणी केली असता नग्न अवस्थेत एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला.

पोलिसांनी त्वरित सिव्हील हॉस्पिटलला फोन करून लादेन यांची ऍम्ब्युलन्स मागून घेतली तो मृतदेह प्लास्टिक मध्ये गुंडाळून सिविल हॉस्पिटल कडे शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला आहे.त्या मयत इसमाची ओळख पटली नसून बेवारस मृतदेह म्हणून पोलिसांनी नोंद केल्याची माहिती असून हा खून की आत्महत्या याबाबत तर्कवितर्क काढले जात आहेत.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!