सोशल मीडियावर मुलीची बदनामी, परप्रांतीय तरुण पोलिसांच्या ताब्यात

सोशल मीडियावर मुलीची बदनामी, परप्रांतीय तरुण पोलिसांच्या ताब्यात
सांगोला (तालुका प्रतिनिधी): तालुक्यातील पिडीत मुलीशी लुडो गेम खेळत -खेळत व्हाट्सअप इन्स्टांग्राम या सोशल मीडियावरून एकाने मैत्री केली. नंतर एकमेकांचे व्हाट्सअपद्वारे अश्लील चित्रीकरण करून तिची नातेवाईक, सोशल मीडियावर बदनामी केलेल्या परप्रांतीय तरुणाच्या अखेर सांगोला पोलीस स्टेशनतर्ंगत डीबी पथकाच्या पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून त्याच्याच गावातून मुसक्या आवळल्या. अमनदीप करम सिंग वय २३ रा. लखना थापा ता. पट्टी जि.तरण तारण राज्य पंजाब असे अटक केलेल्या परप्रांतीय तरुणाचे नाव आहे.
सांगोला तालुक्यातील पीडित मुलगी ही लिडो गेम खेळत असताना अज्ञाताने व्हाट्सअपवर तिच्याशी चॅट करून तिचा विश्वास संपादन केला. नंतर तिचा मोबाईल नंबर घेऊन त्याने तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर तो तिला व्हाट्सअप, इंस्टाग्राम या सोशल मीडियाद्वारे व्हिडिओ कॉल करून बोलणे रेकॉर्डिंग करीत होता. तिला व्हिडिओ कॉलद्वारे अश्लील बोलायचा. तो स्वतःही अश्लील हावभावाचे व्हिडिओ चित्रीकरण करून तिला पाठवत होता. दरम्यान त्याने पीडितेचे केलेले अश्लील चित्रीकरण तिच्या नातेवाईक, युट्यूब, इंस्टाग्राम व कॉलेजमधील ग्रुपवरती पाठवून पिडीतीची बदनामी केल्याने हा प्रकार तिच्या लक्षात आला. याबाबत, पीडितेने सांगोला पोलिसात फिर्याद दाखल केली होती पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
सांगोला पोलीस स्टेशनतर्ंगत डीबी पथकाच्या पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून त्याच्याच गावातून मुसक्या आवळल्या. अमनदीप करम सिंग वय २३ रा. लखना थापा ता. पट्टी जि.तरण तारण राज्य पंजाब असे अटक केलेल्या परप्रांतीय तरुणाचे नाव आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक हिम्मतराव जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील , पोलिस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदेश नाळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल दत्ता वजाळे, पोलीस नाईक अभिजित मोहोळकर, पोलीस नाईक सुखदेव गंगणे, पोलीस नाईक बाबासाहेब पाटील यांनी केली.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!