ट्रॅक्टरने मोटर सायकलस्वारास ठोकरल्याने झारखंड राज्यातील एकाचा मृत्यू मंगळवेढा-मरवडे मार्गावरील घटना,ट्रॅक्टर चालकाविरूध्द गुन्हा दाखल

ट्रॅक्टरने मोटर सायकलस्वारास ठोकरल्याने झारखंड राज्यातील एकाचा मृत्यू
मंगळवेढा-मरवडे मार्गावरील घटना,ट्रॅक्टर चालकाविरूध्द गुन्हा दाखल
मंगळवेढा(प्रतिनिधी)ः मंगळवेढा-मरवडे मार्गावर ट्रॅक्टर चालकाने निष्काळजीपणे भरधाव वेगात वाहन चालवून मोटर सायकलस्वारास धडक देवून अकबर शेख (वय ३८रा.बालूग्राम जि.साहेबगंज,झारखंड) याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी जितेंद्र दुर्योधन साखरे(रा.उचेठाण) याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

या घटनेची हकिकत अशी,मंगळवेढा-मरवडे मार्गावर दि.२२ रोजी सकाळी ८.४५ वा. एम एच ४५ यु ५९६१ या मोटर सायकलवर यातील मयत अकबर शेख हा रबीउल शेख यास पाठीमागे बसवून जात असताना तळसंगी फाटयाजवळील माऊली हॉटेलजवळ ते आले असता समोरून येणारे ट्रॅक्टर नं.के.ए.२८ टी.८८९८ याचे पाठीमागील दोन डंपींग ट्रॉल्या असलेल्या ट्रॅक्टरने जोराची धडक दिल्याने अकबर शेख हा गंभीर जखमी होवून जागेवर मयत झाला. तर पाठीमागे बसलेला रबीउल शेख हा जखमी झाला आहे. या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचे २० हजार रुपयांचे नुकसान होण्यास आरोपी जितेंद्र साखरे हा कारणीभूत ठरल्याचे अब्दुलकलाम मैनूल हक शेख यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.या अपघाताचे वृत्त पोलिस हवालदार महेश कोळी यांना समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी जावून अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली. तसेच मयताचे शवविच्छेदन करून मृतदेह संबंधितांच्या नातेवाईकाकडे रात्री कोळी यांनी ताब्यात दिला आहे.झारखंड हे अपघात स्थळापासून दूर असल्याने सदर मृतदेह विमानाने नेण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे पोलिस सुत्रांकडून सांगण्यात आले.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!