बेकायदा जमाव जमवून वाढदिवस साजरा करणे पडले महागात मंगळवेढ्यात १५ जणांविरूध्द गुन्हे दाखल

बेकायदा जमाव जमवून वाढदिवस साजरा करणे पडले महागात
मंगळवेढ्यात १५ जणांविरूध्द गुन्हे दाखल
मंगळवेढा(प्रतिनिधी)ः मंगळवेढा शहरात जमावबंदीचा आदेश झुगारून गणेश धोत्रे याने जमाव एकत्र करून सार्वजनिक शांतता भंग करीत वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी गणेश धोत्रे,रवी घुले,अर्जुन देवकर,किरण घोडके,अजय आसबे,बागवान आडनाव असलेले दोन इसम व अन्य ६ ते ७ जणांविरूध्द मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,मंगळवेढा शहरातील जुनी भाजी मंडई येथे दि.२१ रोजी रात्री १०.०० वा. मोठा जमाव जमवून कोणाचा तरी वाढदिवस साजरा होत असल्याची गोपनीय माहिती पोलिस प्रशासनास मिळताच फिर्यादी तथा गोपनीय विभागाचे पोलिस हवालदार दिगंबर गेजगे व पोलिस उपनिरिक्षक शेटे यांनी सदर ठिकाणी जावून पाहणी केली असता ध्वनीक्षेपक लावून १० ते १५ लोक वाढदिवस साजरा करीत असल्याचे निदर्शनास आले.पोलिसांनी अधिक चौकशी केली असता हा वाढदिवस आरोपी गणेश धोत्रे याचा असून यातील अन्य आरोपी बापू भोसले,रवी घुले,अर्जुन देवकर,किरण घोडके,अजय आसबे,बागवान आडनावाचे दोन इसम व अन्य ६ ते ७ आदी लोक तेथे जमाव जमवून वाढदिवस साजरा करीत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. पोलिसांना पाहताच सर्वजण पळून गेले.जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जमावबंदी मनाई आदेश व सार्वजनिक शांतता राखण्याचा आदेश लागू केला असताना सदर इसमांनी आदेशाचा भंग केला असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा तपास सहाय्यक फौजदार शेख हे करीत आहेत.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!