मुस्लिम कब्रस्तानच्या जुन्या कंपाउंडच्या पाच लाख रुपयांचे नुकसानाची तक्रार

मुस्लिम कब्रस्तानच्या जुन्या कंपाउंडच्या
पाच लाख रुपयांचे नुकसानाची तक्रार
मोहोळ (प्रतिनिधी)ः मोहोळ शहरातील असणारे मुस्लिम दफनभूमी येथे वादग्रस्त वॉल कंपाऊंडचे काम चालू असून या कामाच्या जुन्या कंपाउंडचे दगड विटा व इतर वस्तू व साहित्याची विल्हेवाट ठेकेदाराने परस्पर लावल्याने सुमारे चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान मुस्लिम कब्रस्तानचे केले असल्याची तक्रार रफिक हरणमारे व इब्राहम मुबारक शेख यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यधिकारी नगरपरिषद यांच्याकडे केली आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,मोहोळ शहरातील मुस्लीम दफनभूमी वॉल कंपाऊंड चे काम चालू आहे हे काम करताना जुने साहीत्य दगड, विटा व इतर वस्तू ठेकेदाराने नाहीशा केल्या आहेत. जुन्या वस्तू व साहित्याची विल्हेवाट ठेकेदाराने लावली आहे. मुस्लीम समाजातील लोक नमाज पठण करण्यासाठी जो हॉल बांधण्यात आला आहे त्यामध्ये पूर्वी असलेली सिमेंट बार तसेच मशनरीचे साहित्य,जुन्या बोरची मोटर व वायर दानपेटी ९५० फूट हस्ती पाईप आदी साहित्य हे कबरस्तान चे असून ते त्यांच्या परस्पर कोणालाही विश्वासात न घेता ठेकेदाराने कुलूप तोडून वस्तू गायब केले आहे तरी मुस्लीम कमेटी मार्फत ठेकेदारावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे आणि ते साहीत्य नेलेले आहे ते साहित्य पुन्हा कबरस्तान मध्ये जमा करण्यात यावे. नगरपालिकेने ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा या दोघांनी दिला आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!