बंद खोलीचे कुलूप तोडून बॅटर्या लंपास

बंद खोलीचे कुलूप तोडून बॅटर्या लंपास
सोलापूर (प्रतिनिधी) मोबाईल टावरच्या बंद खोलीचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने बॅटर्या चोरून नेल्याची घटना दि. १ ते २ ऑक्टोंबर दरम्यान हत्तुर गाव सोलापूर येथे घडली.याप्रकरणी कुमार मारुती सरतापे (वय-४०,रा.मु.पो.औराद,ता.दक्षिण सोलापूर) यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,फिर्यादी यांचे हत्तुर गावांमधील मोबाईल टावर च्या बंद खोलीचे कुलूप कोंयडा अज्ञात चोरट्यांनी तोडून प्रवेश केला.त्यानंतर चोरट्यांनी नऊ हजार रुपये किमतीचे २४ नगर अमर राजा कंपनीच्या बॅटर्‍या मुद्दामून लबाडीने चोरून नेले आहे.असे फिर्यादीत म्हटले आहे.या घटनेची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात झाली असून,या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल म्हेत्रे हे करित आहेत.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!