घरावर टॉवर बसवण्याच्या कारणावरून मारहाण

घरावर टॉवर बसवण्याच्या कारणावरून मारहाण
सोलापूर (प्रतिनिधी) घरावर टॉवर बसवण्याच्या कारणावरून शिवीगाळ करत एकास मारहाण केल्याची घटना दि.१६ ऑक्टोंबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास चित्तूर चिनम्मा नगर सैफुल विजापूर रोड सोलापूर येथे घडली.याप्रकरणी जीवन सोपान बनसोडे (वय-२८,रा.कित्तुर चिनम्मा नगर,सैफुल,विजापूर रोड,सोलापूर) यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.त्यांच्या फिर्यादीवरुन राम इरकल,शुभम इरकल,गंगाबाई इरकल,सुनिता इरकल (सर्व.रा.सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,फिर्यादी यांच्या राहत्या घरावर एअरटेल कंपनीचा लोक टावर बसवल्यामुळे वरील संशयित आरोपींनी फिर्यादीला घरावर टॉवर कसा बसविला तुमच्याकडे परवाना आहे का असे विचारणा केली.त्यावेळी फिर्यादीने वरील संशयित आरोपींना तुमचा काय संबंध आहे.आमच्या घरावर टॉवर बसवीत आहोत असे म्हणाले.त्यावेळी आरोपीने फिर्यादीला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत तू कशाला शहाणपणा कराला असे म्हणून पडलेला फरशीचा तुकडा घेऊन मारहाण केली.असे फिर्यादीत म्हटले आहे.या घटनेची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात झाली असून,या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल म्हेत्रे हे करित आहेत.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!