मार्केट यार्ड येथे दुकान फोडण्याचा प्रयत्न

मार्केट यार्ड येथे दुकान फोडण्याचा प्रयत्न
सोलापूर (प्रतिनिधी) मार्केट यार्ड येथे अज्ञात चोरट्याने किराणा दुकान फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना दि.१७ ते १८ ऑक्टोंबर दरम्यान मार्केट यार्ड ब्रदर्स यांच्या बी -१/६९ सोलापूर येथे घडली. याप्रकरणी दगडू इंद्रवान गिरे (वय-६०,रा.मु.पोस्ट मार्डी ता.उत्तर सोलापूर) यांनी जेलरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,फिर्यादी यांच्या किराणा दुकानात कोणीतरी अज्ञात चोरट्याने प्रवेश केला.त्यानंतर दुकानातील लोखंडी कपाट फोडले व आतील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले.कपाटात मौल्यवान वस्तू व पैसे नसल्याने दुकानात चोरी करण्याचा प्रयत्न केला.असे फिर्यादीत म्हटले आहे.या घटनेची नोंद जेलरोड पोलिस ठाण्यात झाली असून,या घटनेचा पुढील तपास पोसई शेख हे करित आहेत.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!