पंढरपूर सिंहगडच्या ७ विद्यार्थ्यांची “बायजू” कंपनीत निवड १० लाखांचे पॅकेज घेणारे सिंहगड मधील ७ विद्यार्थी

पंढरपूर सिंहगडच्या ७ विद्यार्थ्यांची “बायजू” कंपनीत निवड

○ १० लाखांचे पॅकेज घेणारे सिंहगड मधील ७ विद्यार्थी

पंढरपूर: प्रतिनिधी

एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी (ता. पंढरपूर) येथील महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेले आदित्य लाले, अक्षय पैठणकर, नागेश मोरे, सिव्हिल इंजिनिअरींग विभागातील वृषभ जैन, प्रद्युम्न शिंदे, इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागातील महेश जाधव आणि काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील कृष्णा सोनटक्के अशा एकुण ७ सात विद्यार्थ्यांची “बायजू” कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असल्याची माहिती प्लेसमेंट ऑफिसर प्रा. समीर कटेकर यांनी दिली.
“बायजू” ही कंपनी जगातील सर्वात मूल्यवान शैक्षणिक क्षेत्रातील माहिती देणारी कंपनी आहे. भारतातील “सर्वात आवडती शाळा” शिक्षण ऍप ची निर्माती “बायजू” कंपनीने केली आहे. या कंपनीत १ ते १२ मधील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अनुकूल, आकर्षक आणि प्रभावी शिक्षण, कार्यक्रम तसेच एनईईटी आणि स्पर्धात्मक परीक्षेची तयारी या कंपनीकडून घेण्यात येते.
आज ऍपमध्ये ७० दशलक्षांपेक्षा जास्त नोंदणीकृत विद्यार्थी आणि ४.५ दशलक्ष वार्षिक पेड सदस्य आहेत. १७०० हून अधिक शहरांतून दररोज सरासरी ७१ मिनिटे ऍपवर एखादा विद्यार्थी खर्च करत असताना, शिक्षणाचा संपूर्ण नवीन मार्ग तयार करीत आहे. २०१९ च्या सुरुवातीच्या काळात, संपूर्ण ऑफलाइन, ऑनलाईन शिकण्याच्या अनुभवात रूपांतरित करण्यासाठी “बायजू” कंपनीने शैक्षणिक खेळांची पालो अल्टो-आधारित निर्माती “ओस्मो” विकत घेतली. २०२० मध्ये, बायजू ने “व्हाईटहॅट जूनियर” ही एक भारतीय शैक्षणिक माहिती देणारी कंपनी देखील मिळविली. ही कंपनी विद्यार्थ्यांना परस्पर संवाद, कोडींग, अभ्यासक्रम उपलब्ध करते. “बायजू” हा भारतीय क्रिकेट संघाचा अधिकृत प्रायोजक देखील आहे. जागतिक स्तरीय शिक्षण अनुभव प्रदान करणे, बायजू प्रोग्राम शिकणे इत्यादींवर ही कंपनी काम करते. पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील दर्जेदार शिक्षण व विद्यार्थ्यांना दिले जाणारे गुणवत्तापूर्ण शिक्षण यामुळेच महाविद्यालयातील विद्यार्थी नामांकित कंपनीत निवडले जात आहेत.
“बायजू” ऍप प्रत्येक विद्यार्थ्यांच्या वेगळ्या पद्धतीने आणि त्यांच्या शिक्षण पद्धतीनुसार अद्वितीय शिक्षण शैलीनुसार तयार करण्यासाठी डिझाइन केले आहे. महाविद्यालयातील ७ विद्यार्थ्यांची निवड झाल्याबद्दल विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदी वातावरण निर्माण झाले आहे. या कंपनीकडून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणानंतर वार्षिक १० लाख रूपये पॅकेज मिळणार आहे.
“बायजू” कंपनीत प्लेसमेंट झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेन्ट ऑफिसर प्रा. समीर कटेकर, डॉ. चेतन पिसे, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. संपत देशमुख, डॉ. श्रीगणेश कदम , प्रा. अतुल कुलकर्णी, प्रा. योगिनाथ कलशेट्टी, प्रा. अभिजित सवासे आदी सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!