८, लाख मेट्रिक.टन.ऊस गाळपाचे उद्दीष्ट. – ८.३३% कामगाराना दिपावली बोनस देणार.-धनंजय महाडिक

८, लाख मेट्रिक.टन.ऊस गाळपाचे उद्दीष्ट. – धनंजय महाडिक
८.३३% कामगाराना दिपावली बोनस देणार.
भीमाच्या ’सभासदांची व प्रशासनाची’ कोंडी करून मागासलेली विचारसरणी, अपूर्ण ज्ञानाने विरोधकानी प्रचंड त्रास देण्याचे काम केले. शेतकर्याची थकित बिले द्यावी हि बचावसमितीची मागणी असताना त्यानी प्रतेक ठिकाळी अडथळा का निर्माण केला? मग या वेळी सभासदाच्या हिताचा मुद्दा कुठे गेला ? असा सवाल या वेळी महाडिक यानी केला
ते भीमा सह.साखर कारखान्याचा सन. २०२१-२०२२गळीत हंगामाचा ४२ वा बॉयलर अग्नीप्रदिपन सोहळा कारखान्याचे अध्यक्ष माजी खासदार धनंजय महाडिक व त्याच्या सुविद्य पत्नी सौ.अरुंधती महाडिक याच्या हस्ते आज सकाळी १०.४५ ला.बॉयलर अग्नी देऊन संपन्न झाला त्या नंतर उपस्थित ऊस उत्पादक शेतकर्‍यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
महाडिक म्हणाले कि, ’विरोधकाना सभासदाचे व कामगाराचे काहिही देणे घेणे नव्हते.त्याना फक्त भिमा चालु होऊ द्याचा नव्हता. सभासदाची दिशा भूल करून स्वतःची राजकिय पोळी भाजून घेण्याचा डाव होता. कोणत्याही गोष्टीची शहनिषा नकरता स्वतःच्या स्वर्थापाई प्रसिध्दी माध्यमानाही त्यानी सोडले नाही. परंतु माझ्याकडे सभासदा आशिर्वाद असल्याने मी सर्व संकटावर मात करू शकलो, या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब पाटील, व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणविस यानी सभासद, कामगार व संस्था सर्वागीण विचार करून मला मदत केली असल्याचे सांगत त्याचे त्यानी जाहीर आभार मानले.
,’चालु वर्षी उत्तम पाऊस झाला आहे. कार्यक्षेत्रातील ऊस मुबलक व उत्तम प्रतिचा आला आहे. परंतु त्या ऊसावर अनेक कारखाने टपून आहेत, तर सभादानी संपूर्ण ऊस भिमाला गाळपासाठी द्यावा, आपण ऊस दरा बाबत इतर कारखान्यापेक्षा नक्कीच आग्रेसर असणार आहोत हा माझा शब्द आहे असे म्हणाले. ते पुढे साखरकारखानदारीस अत्यंत चांगले दिवस येणार अस्याचेही म्हणाले.
या वेळी भिमा उपाध्यक्ष सतिश जगताप, कार्यकारी संचालक एस. जे.शिंदे,रामहरी रणदिवे बाबुराव शिंदे,तुषार चव्हाण, बापुसो चव्हाण, बिभीषण वाघ, दिनकर देशमुख ,गणपत पुदे ,बापु गवळी अनिल गवळी अदी संचालक व धोडिंबा उन्हाळे, गंगाधर चवरे, बाळासो पवार, शिवपुजे आप्पा, सुरेश सावंत,संभाजी कोकाटे, सुनिल चव्हाण, संग्राम चव्हाण, भिमराव वसेकर, जयंत पाटिल अदी मान्यवर उपस्थित होती

ताज्या बातम्या

error: Content is protected !!