सोलापूर जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासन अधिकारी हप्तेखोर – शरद कोळी

सोलापूर जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासन अधिकारी हप्तेखोर – शरद कोळी
पंढरपूर (प्रतिनिधी)
शासण बंदी असताना सुद्दा सोलापूर जिल्ह्यात सर्वञ खुलेआम पणे अवैद्य गुटखा विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे दिसुन येत आहे गुटखा बंदी कायद्याची अंमलबजावणीची जबाबदारी असलेला विभागच या अवैद्य गुटखा विक्रीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने जिल्ह्यातील हजारो तरूण युवक व्यसनाधीन बनत आहेत तथापी गुटखा सेवनाने अनेक तरूणांना कॅन्सर आजाराने ग्रासले आहे तर काहींना आपला जीव गमवावा लागला आहे हे या ठिकाणीच थांबत नसून दुर्दैव अस की काहींच्या निधनानंतर माता भगिनिंच्या डोळ्यातील अश्रु तर काही ठिकाणी लहान निरागस मुलांकडे पाहिल्यानंतर आपल्यासुद्धा डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहणार नाही अशी गंभीर परिस्थिती सोलापूर जिल्ह्यात असताना व या अवैद्य गुटखा विक्रीस शासणाने पायबंद घालण्यासाठी कडक कायदा अमलात आणला असताना या संबधी स्वतंञ विभाग असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकारी अशा संवेदनशील परिस्थितीत ही हप्तेखोरी करून अवैद्य गुटखा विक्रीवर थातुर मातुर अशी एकादी कारवाई करत असल्याचा आरोप धाडस सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद कोळी यांनी केला आहे तसेच येत्या 15 दिवसांमध्ये जिल्ह्यात अवैद्य गुटखा विक्री आढळुन आल्यास त्यास संबधित अधिकारी यांच्यावर प्रथम कारवाई करावी अशी मुंबई हायकोर्ट येथे जनहित याचिका दाखल करणार असल्याचेही त्यांनी एका प्रसिद्धी पञकात म्हंटले आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!