बंद पुकारणार्‍या महाविकास आघाडीच्या १०० जणांची अटक व सुटका

बंद पुकारणार्‍या महाविकास आघाडीच्या १०० जणांची अटक व सुटका
सोलापूर, (प्रतिनिधी):- केंद्र सरकारच्या विरोधात आणि शेतकर्‍यांवर हल्ला केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील पक्षाने पुकारलेल्या बंद मध्ये सहभागी व्हा असे आवाहन करणार्‍या महाविकास आघाडीच्या १०० जणांना पोलीसांनी अटक करून त्यांची सुटका केली.
फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कॉग्रेसचे चेतन नरोटे, लक्ष्मीनारायण दासरी यांच्यासह ३२ जण, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चंद्रकांत उत्तम दिक्षित व इतर १० जण, सदर बझार पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिवसेनेचे पुरूषोत्तम बरडे, राष्ट्रवादी कॉग्रेसचे भारत जाधव, कॉग्रेसचे आंबादास करगुळे व इतर १४ जण आणि नरसय्या आडम मास्तर यांच्यासह २२ जण तर जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत भिमाशंकर मंजेली, युसुफ हनिफ शेख, अनिल वासम व इतर १२ हे सर्वजण केंद्र सरकारच्या निषेधार्थ तसेच उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे शेतकर्‍यांच्या आंदोलनादरम्यान त्यांना चिरडून शेतकर्‍यांची हत्या करणार्‍या भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय मंत्री आणि त्यांच्या मुलाच्या विरूध्द घोषणाबाजी करताना आढळून आले. यामध्ये कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस, शिवसेना आणि कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने बंद पुकारला होता. त्या दरम्यान हा बंद यशस्वी व्हावा म्हणून हे सर्वजण घोषणाबाजी करीत असताना पोलीसांनी एकूण १०० जणांना ताब्यात घेवून त्यांना सोडून दिले. अशी माहिती पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडुकर यांनी दिली.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!