लायन्स क्लब पंढरपूरच्या वतीने जागतिक टपाल दिन साजरा

लायन्स क्लब पंढरपूरच्या वतीने जागतिक टपाल दिन साजरा
लायन्स क्लब ऑफ पंढरपूर व पंढरपूर हेड पोस्ट ऑफिस यांच्या वतीने जागतिक टपाल दिन साजरा करण्यात आला. भारतीय डाक विभाग हा जनसामान्यांसाठी अविरत सेवा सेवा देत असतो तसेच 9 ऑक्टोंबर जागतिक टपाल दिन निमित्ताने पोस्ट ऑफिस मधील अधिकारी व पोस्टमन यांचा सत्कार करण्यात आला. उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल संतोष खुणे पोस्ट मास्तर,श्री बी.के.मोहिते,श्री एस.डी.रकटे,श्री सोमनाथ गायकवाड,श्री शिवाजी तोंडले,पोस्टमन श्री रमेश भानावत,श्री दत्ता कांबळे,श्री गोपाल चव्हाण,श्री अशोक वायदंडे,श्री शुभम लंगोटे, श्री गौरव कुलकर्णी,श्री बाळू कोळी,पूजा नागटिळक,श्री तुकाराम देशमुख,श्री रतिलाल वाघमारे,श्री हणमंत मलपे,श्री राहुल मोहिते,श्री शशिकांत आयतोडे,हेड पोस्टमन श्री बाळासाहेब खंडागळे,सॉर्टींग पोस्टमन श्री वैजिनाथ महामुनी यांना कृतज्ञता प्रमाणपत्र लायन्स संस्थेच्या वतीने देण्यात आली.
सहाय्यक पोस्ट मास्तर श्री सोमनाथ गायकवाड यांनी पोस्ट ऑफिस च्या स्थापने पासून ते आजपर्यंतचा इतिहास सांगितला व पोस्ट ऑफिस करत असलेल्या कामांची माहिती दिली. पोस्टमास्तर श्री संतोष खुणे यांनी पोस्ट ऑफिसने राबवलेल्या व राबवत असलेल्या योजनेची माहिती दिली. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक लायन्स क्लबचे ज्येष्ठ सदस्य रा.पा.कटेकर यांनी केले, त्यांनी लायन्स क्लब करत असलेल्या सेवा कार्याची व पर्मनंट प्रोजेक्टची माहिती दिली तसेच अध्यक्ष श्री विवेक परदेशी यांनी पोस्ट ऑफिस मधील अधिकारी, कर्मचारी देत असलेल्या सेवे बद्दल कृतज्ञता व्यक्त केली या पुढे ही पोस्ट ऑफिस कर्मचारी व समाजातील विविध घटकांसाठी विविध उपक्रम राबवणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी तोंडले यांनी केले तर आभार सचिवा ललिता कोळवले यांनी मानले. सदर कार्यक्रमास अँड भारत वाघुले, मुन्नागीर गोसावी, कैलास करंडे, सुरेखाताई कुलकर्णी, सिमाताई गुप्ता, पोस्ट ऑफिस मधील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!