पाटकुल येथे घरजागेगा हद्दीच्या वादात वकिलास मारहाण

पाटकुल येथे घरजागेगा हद्दीच्या वादात वकिलास मारहाण
मोहोळ (प्रतिनिधी)ः पाटकुल (ता.मोहोळ) येथे घर जागेच्या हद्दी खुणा असलेले दगड का काढले? म्हणून विचारले असता,वकिलास गंभीर मारहाण केल्याची घटना घडली असून, मोहोळ पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहेे.
मोहोळ तालुक्यातील पाटकुल येथील रामचंद्र उत्तम वसेकर हे वकीली व्यवसाय करतात. या व्यवसाय निमित्त सध्या पुणे येथे राहत आहेत. त्यांचा चुलत भाचा प्रशांत बिरू जाधव यांनी त्यांच्या घरामागील तीन फूट जागा असताना हद्दी खुणा असलेले दगड काडून टाकले होते. ते दगड का काडून टाकले म्हणून विचारले असता त्याने ड रामचंद्र वसेकर यांना चप्पल फेकून मारली. त्यानंतर हातात दगड घेऊन तो नाकावर मारला .त्यामुळे त्यांच्या नावास दुखापत झाली. त्यांचा चुलत भाऊ सुनील वसेकर आणि चुलती नंदा वसेकर या दोघांनी त्यांचे दोन्ही हात धरून पकडले व प्रशांत जाधव त्याने पोटात बुक्क्या मारल्या. तसेच चप्पलनेही मारहाण केली .एवढे मारूनही त्यांनाच उलट केस करण्याची धमकी दिली. ही घटना रविवारी दुपारी साडेतीन वाजणेच्या सुमारास घडली .याबाबत प्रशांत जाधव, सुनिल वसेकर, नंदा वसेकर या तिघा विरोधात मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!