कर्नाटकातून येणारा गुटखा पकडून एकाविरूध्द केला गुन्हा दाखल

कर्नाटकातून येणारा गुटखा पकडून एकाविरूध्द केला गुन्हा दाखल
मंगळवेढा(प्रतिनिधी)ः कर्नाटक राज्यातून मंगळवेढयाकडे येणारा बेकायदेशीर ६ हजार रुपये किमतीचा गुटखा अन्न औषध प्रशासन विभागाने पकडला असून या प्रकरणी सोमनाथ बापू हुग्गे रा.तळसंगी याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,दि.८ रोजी ११.३० वा. कर्नाटक राज्यातून मंगळवेढयाकडे बेकायदेशीर येणारा ६ हजार १२० रुपये किमतीचा गुटखा त्यामध्ये ३६०० रु.किमतीचा आर.एम.डी.पान मसाला ५ बॉक्स,१५०० रु.किमतीची सुगंधी तंबाखू ५ बॉक्स,४८० रु.किमतीचे फिलिंग चंदन स्विट सुरपाी ८ पाकिटे,५४० रुपये किमतीची राजू सुपारी ९ पाकिटे असा गुटखा पकडला असून याची फिर्याद अन्न भेसळचे उमेश भुसे यांनी दिल्यावर सदर आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान,कर्नाटक राज्यातून मोठया प्रमाणात मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात गुटखा येत असून पान टपर्‍या व छोटे हॉटेल यावरून खुले आम विक्री सुरु असल्याचे चित्र आहे.महाराष्ट्रात गुटखा विक्रीला बंदी असतानाही कर्नाटक राज्य जवळ असल्याने त्याची विक्री करून काळे धंदेवाले अव्वाच्या सव्वा पैसे कमाविण्यात मग्न असल्याची चर्चा होत आहे. पोलिस प्रशासन व अन्न औषध प्रशासन यांनी जातीने लक्ष घालून महाराष्ट्रात येणारा गुटखा थांबवून शासनाने काढलेल्या आदेशाची अंमलबजावणी करावी अशी मागणी होत आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!