रस्त्याच्या कारणावरुन महिलेस मारहाण, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

रस्त्याच्या कारणावरुन महिलेस मारहाण, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
सांगोला (तालुका प्रतिनिधी): पती-पत्नी शेतात बांधलेली जनावरे आणण्यासाठी जात असताना तुम्ही येथून जायचे नाही असे म्हणून पाच जणांनी मिळून महिलेस काठीने, हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी केली. तसेच फिर्यादी महिलेच्या गळ्यातील पाऊण तोळ्याचे सोन्याचे गलसर व अर्धा तोळ्याचे पत्ता हिसका देवून तोडून घेतले. ही घटना ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता जवळा ता.सांगोला येथे घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, जवळा ता.सांगोला येथील जयदा इकबाल शेख व पती इकबाल असे दोघेजण शेतात बांधलेली जनावरे आणण्यासाठी जात होते. त्यावेळी भावकीतील पैगंबर इसाक शेख, मुमताज पैगंबर शेख, हमीद पैगंबर शेख, शपूदीन इसाक शेख, मुमताज शपूदिन शेख यांनी जयदा शेख व इकबाल शेख यांना तुम्ही आमच्या शेतातून का जाता असे म्हणू शिवीगाळ, दमदाटी करु लागले. शपूदीन शेख याने हातातील चिल्लारीच्या काठीने जयदा शेख यांना हातावर, पाठीवर मारहाण केली. तसेच पैगंबर शेख, मुमताज शेख, हमीद शेख, मुमताज शेख यांनी हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मुमताज शेख व मुमताज शेख यांनी जयदा शेख यांच्या गळ्यातील पाऊण तोळ्याचे सोन्याचे गलसर व अर्धा तोळ्याचे पत्ता हिसका देवून तोडून घेतला तसेच मोबाईल फोडून ५ हजार रुपयांचे नुकसान केले. याप्रकरणी जयदा शेख यांनी वरील पाच जणांविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!