गैरकायद्याची मंडळी जमवून २० हजारांचे नुकसान, १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

गैरकायद्याची मंडळी जमवून २० हजारांचे नुकसान, १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
सांगोला (तालुका प्रतिनिधी): गैरकायद्याची मंडळी जमवून तुम्ही आमच्या विरोधात तक्रार देता का असे म्हणून फिर्यादीची पत्नी व आईस हाताने मारहाण करुन शिवीगाळ दमदाटी केली. तसेच घरासमोरील प्लॉस्टिक बॅरेल, सिमेंटचे दोन बॅरेल, दोन पाईप, केबल, विहिरीच्या चेंबरची पाईप, शेळ्यांची वाघर तोडून फोडून सुमारे २० हजार रुपयांचे नुकसान केले. ही घटना ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास जुनोनी ता.सांगोला येथे घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, जुनोनी ता.सांगोला येथील शिवाजी दिगंबर व्हनमाने हे ८ ऑक्टोबर रोजी दुपारी एकच्या सुमारास सांगोला पोलीस ठाण्यात सुधाकर यशवंत व्हनमाने, तुकाराम लक्ष्मण व्हनमाने, अरुण धोंडी व्हनमाने, संजय बाबा उर्फ महादेव व्हनमाने सर्व रा.जुनोनी ता.सांगोला यांच्या विरोधात तक्रार देण्याकरीता गेले होते. दरम्यान तक्रार देऊन घरी गेले असता त्यांची आई व पत्नी यांनी सांगीतले की भावकीतील अरुण धोंडीबा व्हनमाने, तुकाराम लक्ष्मण व्हनमाने, सुधाकर यशवंत व्हनमान, भिमराव तुकाराम व्हनमाने, शिवाजी बाबा व्हनमाने, राजेंद्र सयाप्पा व्हनमाने, तानाजी बाळू व्हनमाने, विकास तानाजी व्हनमाने, दत्तू बाळू व्हनमाने, अरुण दत्तू व्हनमाने, सुनिल यशवंत व्हनमाने, नारायण मारुती व्हनमाने, शामराव शेकू व्हनमाने, नामदेव शंकर व्हनमाने, मनोज मधूकर
व्हनमाने, मारुती विठोबा व्हनमाने, बंडू नवनाथ व्हनमाने सर्व रा.जुनोनी ता.सांगोला हे सर्वजण आले होते. त्यांनी फिर्यादी शिवाजी व्हनमाने यांनी पत्नी व आईस तुम्हाला लय मस्ती आली आहे असे म्हणून घरासमोरील प्लॉस्टिक बॅरेल, सिमेंटचे दोन बॅरेल फोडले तसेच दोन पाईप, केबल, विहिरीच्या चेंबरची पाईप, शेळ्यांची वाघर तोडून फोडून सुमारे २० हजार रुपयांचे नुकसान केले. त्यावेळी शिवाजी व्हनमाने यांची पत्नी मनिषा व आई हारुबाई या त्यांना अडवण्यासाठी गेल्या असता भिमराव व्हनमाने, नारायण व्हनमाने, बंडू व्हनमाने यांनी त्यांना शिवीगाळ, दमदाटी करुन हाताने मारहाण करुन ढकलून दिले. याप्रकरणी शिवाजी दिगंबर व्हनमाने यांनी वरील १७ जणांविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!