कौठाळी येथे कारने होत असलेल्या वाळु चोरीवर पोलिसांनी

कौठाळी येथे कारने होत असलेल्या वाळु चोरीवर पोलिसांनी केली कारवाई
पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर तालुक्यातील कौठाळी गावामधिल चंद्रभागा नदीपात्रातील गुरसाळे बंधारा येथुन मारूती आल्टो कारने चोरून वाळु काढली जात असल्याची माहिती पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीसांना बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्या मार्गदर्शनाखाली राञ वस्तीवर असलेल्या सपोफौ दिवसे, चालक पोहेकाॅ कुभांर व होमगार्ड हे सदर ठिकाणी गेले असता त्यांना मिळालेल्या माहितीनुसार एक मारूती आल्टो कार त्यांना समोरून येताना दिसली त्यांनी गाडीला थांबण्याचा इशारा केला परंतु पोलिसांना पाहुन त्या बिगर नंबर प्लेटच्या आल्टो कार चालकाने गाडी जागेवरच थांबवून पळुन गेला असल्याची फिर्याद पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे पोकाॅ काळे दिली आहे.
सदर गाडीमध्ये अंदाजे अर्धा ब्रास वाळु मिळुन आली असुन याबाबत अज्ञात व्यक्तींविरोधात भा.द.वि.कलम 379 सह गौण खनिज कायदा अंतर्गत फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!